शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

राज्य सरकारने नागरिकत्त्व दुरुस्ती बिलास विरोध करावा-मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:57 IST

संसदेत मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक ही एकप्रकारे हिटलरशाहीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आहे. हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नव्हे तर संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या बिलास विरोध करावा. केवळ तटस्थ राहणे हा पर्याय नाही,असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

संगमनेर : संसदेत मंजूर झालेले नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक ही एकप्रकारे हिटलरशाहीच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल आहे. हे बिल केवळ मुस्लिमांच्या विरोधात आहे असे नव्हे तर संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे राज्यातील सरकारने या बिलास विरोध करावा. केवळ तटस्थ राहणे हा पर्याय नाही,असे प्रतिपादन जनआंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.दिवंगत स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे सुरु असलेल्या समाजवादी कार्यकर्ता संमेलनानिमित्त पाटकर यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर हरजिंदरसिंह (कवी लालटू), राजा अवसक, अ‍ॅड. निशाताई शिवूरकर, प्रदीप मालपाणी, सदाभाऊ मगदूम, जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांची उपस्थिती होती.पाटकर म्हणाल्या, सध्या देशात व्होट बँकेच्या आधारे लोकांना घाबरविण्याचे राजकारण सुरु आहे. लोकांचा आवाजच दाबला जात आहे. लोकांच्या हक्कासाठी जो लढेल त्याला तुरुंगात टाकले जात आहे. नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक मंजूर करताना ठरवून मुस्लिम धर्माला वगळले गेले. आपली राज्यघटना विशिष्ट धर्मांची नाही. ती सर्वधर्मनिरपेक्षता सांगते. मात्र या विधेयकाने घटनाच मोडीत काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे गावोगावी या विधेयकाच्या विरोधात आंदोलन उभे राहणे आवश्यक आहे. समाजवादी कार्यकर्त्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. जनतेनेही नागरिकत्त्वाच्या नोंदीसाठी कुठलीही कागदपत्रे न देता असहकार पुकारावा.संसदेत विविध राजकीय पक्षांनी या विधेयकास विरोध केला. मात्र, काही पक्ष तटस्थ राहिले आहेत. अशी तटस्थताही योग्य नाही. कारण पुढील निवडणुकीत या राजकीय पक्षांना याबाबत लोकांना उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रात नवे पर्यायी सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने नवा विकल्प देऊ केला आहे. त्यामुळे या सरकारने या विधेयकाच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी. जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी सभेचे सूत्रसंचालन केले. हनुमंत उबाळे यांनी आभार मानले.मंत्रालयाचे दरवाजे उघडल्यासारखे वाटलेमी मुंबईत मंत्रालयात गेले होते. तेव्हा तेथील दरवाजे उघडे पाहून बरे वाटले. गत पाच वर्षे वाईट परिस्थिती होती, असेही मेधा पाटकर म्हणाल्या. आपली काहीही चूक नसताना पासपोर्ट जप्त करण्यात आला. मला जे पत्र पाठविले गेले त्यावर अधिकाºयांची स्वाक्षरी देखील नव्हती. उत्तर देण्याची संधी देखील आपणाला दिली गेली नाही. बडवानी येथे माझे कार्यालय असताना व मी तेथे राहत असतानाही मला फरार दाखविले गेले. हे सगळे आश्चर्यकारक आहे, असेही त्या म्हणाल्या. 

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरSangamnerसंगमनेर