शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

लोककला जोपासणा-या दाम्पत्यावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:36 IST

पहाडी आवाजात शाहिरी गीत सादर करत लोकमनोरंजनाबरोबर लोककला जोपासण्यासाठी आपली शेतजमीन गहाण टाकली. मात्र काळाच्या ओघात या कलाकारांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे तालुक्यातील पाडाळणे येथील वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृध्द कलावंत दांम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

हेमंत आवारी ।  अकोले : ‘चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार .., ‘लई..लई..लई.. जगभर नाव माझ्या भिमान गाजवलं...’ अशा पहाडी आवाजात शाहिरी गीत सादर करत लोकमनोरंजनाबरोबर लोककला जोपासण्यासाठी आपली शेतजमीन गहाण टाकली. मात्र काळाच्या ओघात या कलाकारांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे तालुक्यातील पाडाळणे येथील वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृध्द कलावंत दांम्पत्यावर उपासमारीची वेळ आली आहे.किसन मारुती देठे (वय- वर्षे ७४) या वृध्द तमाशा कलावंतास अद्याप कलाकार मानधन मिळत नाही. कलाकार मानधनासाठी अर्ज करुन देखील अद्याप शासन दरबारी दखल घेतली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित भीम गीते सादर करणाºया त्यांच्या पत्नी सखुबाई यांना शासनाचे प्रतिमहा दोन हजार रुपये मानधन मंजूर आहे. मात्र तेही  दोन-तीन महिन्यांनी एकदा ते मिळते. वयपरत्वे जडलेल्या व्याधींच्या औषधोपचारासही ती रक्कम पुरत नाही. राहण्यासाठी पक्के घर नाही.राहुरी येथे बोर्डिंगमध्ये राहून सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या किसनराव यांनी लग्नानंतर मुंबई गाठली. टेलिफोन खात्यात सहा-सात वर्षे नोकरी केली. लहानपणापासून त्यांना तमाशाची आवड होती. मुलुंड-चेंबूर भागात राहात असताना त्यांची मैत्री तमाशा कलाकारांबरोबर झाली. टेलिफोनचे काम सोडून देत संगम केदार यांच्या तमाशात काम करायला सुरुवात केली. तमाशा मुंबईत थिएटरला लागला की तमासगीराचा उत्साह वाढतो तस त्यांच झालं. केदार यांचा फड वर्षभरात बंद झाला. देठे यांनी मात्र तमाशाचा नाद सोडला नाही.चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक, कांताबाई सातारकर, रघवीर खेडकर, पांडुरंग मुळे मांजरवाडीकर, अंजनाबाई साबळे, विश्वास नांदगावकर, मालती इनामदार अशा तमाशाच्या फडांमध्ये त्यांनी जवळपास २५ वर्षे काम केलं. तमाशा कलावंताच्या वाट्याला येणारी अवहेलना, दु:ख त्यांनी भोगलं. १९९१ ला आंबेडकरी गीतांचा जागर करण्यासाठी नागपूरात दीक्षाभूमीवर शाहिरी जलसा घेऊन किसनराव पोहचले. त्यांच पहाडी आवाजातील सादरीकरण अनेकांना भावले. दुरदर्शनने त्याची दखल घेतली. त्यांच्या जलसा पार्टीचा गुणगौरव झाला. २००१ साली देठे यांनी शेत जमीन गहाण ठेवून कर्ज काढून ‘किसनराव देठे पाडाळणेकर सह शाहीर गंगाधर जगधने मोग्रसकर’ हा तमाशाचा फड उभा केला.  कर्जाच्या गर्तेत अल्पावधीतच फड मोडला. तमाशा उभा करण्यासाठी तारण ठेवलेली जमीन आजही गहाण पडलेली असून या कलाकार दाम्पत्यासभाकरीचा चंद्र शोधण्याची भ्रांत सध्या आहे. ‘हिरो’ची भूमिका मिळे‘आधी गनाला रनी आनला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना’.. अशी पठ्ठेबापूराव, हरिभाऊ रोकडे वडगावकर यांची आठ गण आजही मुखोद्गत आहेत. अनेक गवळणी त्यांच्या पाठ आहेत. गवळणींच्या मेळ्यात किसनदेवाची भूमिका किसनराव लिलया साकारीत. उंची कमी पण देखण्या चेह-यामुळे त्यांना वगनाट्यात ‘हिरो’ची भूमिका मिळे, तमाशात बेरकी पाटलाची भूमिका ते साकारत तर कधी पोलीस अधिकारी म्हणून  स्टेजवर दिसत असत.

दिवंगत दादासाहेब रुपवते, प्रेमानंद रुपवते या चळवळीतील नेत्यांसह वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता महाडीक, अंजनाबाई साबळे, रघवीर खेडकर यांनी जीव लावला. दिवंगत अंजनाबाई यांना मी बहीण मानली होती. नाशिक जिल्ह्यात तिरसुळी गावात आम्हा तमाशा कलाकारांना मारहाण झाली होती. पुणे भागात तमाशा कलाकारांना आजही आदराची वागणूक मिळते. तमाशा कलावंताचा उत्तरार्ध फार कठीण असतो, असे पाडळणे येथील कलावंत किसन मारुती देठे यांनी सांगितले.    

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले