शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; मसूद अजहरनं बहिणीवर सोपवली जबाबदारी
2
'पीएम मोदी गोष्टी लपवतात; ट्रम्प त्या उघड करतात', रशियन तेल खरेदीवरुन काँग्रेसचे टीकास्त्र
3
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
4
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
5
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
6
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
7
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
8
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
9
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
10
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
11
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
12
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
13
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
14
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
15
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल
16
कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण
17
फ्लॅटमध्ये लिव्ह-इनमध्ये राहत होतं जोडपं, दिवाळीच्या दिवशी दुर्गंधी आल्यानं उघडला तर...; दृश्य पाहून सगळेच हादरले
18
हिऱ्याच्या खरेदीपूर्वी ‘हे’ चार नियम माहीत करून घ्या! कट, क्लॅरिटी, कलर, कॅरेटचा फॉर्म्युला काय सांगतो?
19
भारताच्या 'या' स्कीममुळे शेजारी चीनला लागली मिरची; तक्रार घेऊन पोहोचला WTO च्या दरबारी
20
बदल्याची आग! "माझ्यासोबत तुझी बहीण पळून..."; टोमण्यांना कंटाळला, घेतला तरुणाचा जीव

कोंभळी शिवारात स्टेरिंग रॉड तुटल्यामुळे एसटी बस पलटली, २० जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 13:18 IST

कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळील वळणावर स्टेरिंग रॉड तुटल्याने राशिन- अहमदनगर ही एसटी बस अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत.

कर्जत : कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळील वळणावर स्टेरिंग रॉड तुटल्याने राशिन- अहमदनगर ही एसटी बस अचानक पलटी झाली. हा अपघात सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातामध्ये वीस प्रवासी जखमी झाले असून तिघे गंभीर जखमी आहेत.अहमदनगर येथील तारकपूर आगाराची राशिन- अहमदनगर ही बस (एमएच-०६, एस- ८२४२) कोभंळीमार्गे २४ ते ३० प्रवाशी घेऊन नगरच्या दिशेने जात होती. ही कोभंळी शिवारात चिचोंली रमजान फाट्याजवळ वळण घेत असताना अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. 

या बसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांपैकी २० प्रवाशी जखमी झाले. या अपघाताचा आणि प्रवाशांचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील लोकांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली व प्रवाशांना बाहेर काढले. कोभंळीचे पोलीस पाटील शरद भापकर यांनी तातडीने रूग्णवाहिकेशी संपर्क साधला. या अपघाताची खबर मिळताच मिरजगाव दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी सुरेश बाबर, दत्ता कासार घटनास्थळी दाखल झाले. १०८ या रुग्णवाहिकेतून जखमींना उपचारासाठी नगराला हलवण्यात आले तर किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना कर्जतमध्येच उपचार करुन सोडण्यात आले. आशा एकनाथ काळे, प्रांजल सुनील चांगण, बबन दिगंबर गवळी, हिरामण तुकाराम गवळी, प्राजक्ता अप्पासाहेब जोगदंड, दिलीप खरात, मंगल शामराव बोडखे, नानासाहेब धोंडिबा कंद यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रल्हाद खरमरे (वय ७५) यांच्यासह इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांना खासगी रुग्णालयात पाठविण्यात आल्यामुळे त्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. जखमींमध्ये एसटी बस वाहक साबळे यांचाही समावेश आहे तर चालक उत्तम नामदेव शिंदे किरकोळ जखमी झाले आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरstate transportएसटीKarjatकर्जत