शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सोळाशे गावातील शेतक-यांना मिळणार फवारणी संरक्षण किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 19:16 IST

यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यात जनजागृती मोहीम राबविण्यास येत आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार ६०० गावांमध्ये १ नोव्हेबरनंतर १६ हजार संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी औषधविक्रीच्या १७ कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकृषि विभागाचा पुढाकार

अहमदनगर : यवतमाळ जिल्ह्यात औषध फवारणीमुळे झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिह्यात जनजागृती मोहीम राबविण्यास येत आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार ६०० गावांमध्ये १ नोव्हेबरनंतर १६ हजार संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी औषधविक्रीच्या १७ कंपन्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

औषध फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मनुष्यहानीमुळे अहमदनगर जिल्ह्यातही सतर्कतेचे उपाय करण्यात येत आहेत. औषधांची फवारणी करताना शेतकºयांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. फवारणी संरक्षक किट वापरण्याबाबत जागृती करण्यात येत आहे. जनजागृतीबरोबच जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांत फवारणी किटचे वाटप करण्यात येणार आहे. या किटमध्ये चष्मा, मास्क, हातमोजे व अ‍ॅप्रोनचा समावेश आहे. या किटसाठी १७ कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. या मोहिमेअंर्तगत प्रत्येक गावात दहा संरक्षक किटचे वाटप करण्यात येणार आहे. सोळाशे गावांत तब्बल सोळा हजार किटचे वितरण होणार आहे. बाजारात या किटची किंमत २५० ते ३५० रुपये आहे. या वाटपामध्ये फवारणी करणाºया मजुरांना प्राधान्य दिले जाणार आहे. औषध फवारणीच्या जनजागृतीसाठी कृषी विभागाचे प्रशासन तालुका कृषी अधिकाºयांसह कृषी सहायकांच्या कार्यशाळा घेत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून विषबाधेच्या घटना घडू नयेत, यासाठी दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तालुका कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांनी शेतकºयांमध्ये कीडनाशके, तणनाशके, बुरशीनाशके फवारणीबाबत जागरूकता निर्माण करावयाची आहे. अहमदनगर जिल्ह्याबरोबच ही मोहीम पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही राबविण्यात येणार आहे. 

  • शेतक-यांनी फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून व्यापक अशी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. फवारणीनंतर उलटी होणे, मळमळ होणे असा त्रास झाल्यास कीटकनाशक, तणनाशकांच्या रिकाम्या डब्यासह डॉक्टरांशी संपर्क करावा. प्रबोधनासाठी फवारणी किटचे वाटप करण्यात येणार आहे. 
  • - पंडित लोणारे, जिल्हा कृषी अधिकारी