शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

राखीव असूनही इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: October 12, 2016 01:07 IST

ंंअशोक निमोणकर , जामखेड जामखेड नगरपालिका निर्मितीमुळे एक गट कमी होऊन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटांऐवजी दोन गट झाले आहेत.

ंंअशोक निमोणकर , जामखेड जामखेड नगरपालिका निर्मितीमुळे एक गट कमी होऊन तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तीन गटांऐवजी दोन गट झाले आहेत. त्यामुळे या गटातील गावे व लोकसंख्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. या गटात प्रमुख भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना असताना मनसेचादेखील उदय झाला आहे. ‘मनसे’मुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. गट राखीव असल्याने प्रमुख पक्षातील पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते कितपत सक्रिय राहातील याबाबत शेवटपर्यंत संशयाचे वातावरण राहणार आहेत. जवळा गटात ४१ गावे असून, ५८ हजार ७०८ लोकसंख्या आहे. नगर जिल्ह्यातील सर्व गटांपैकी खर्डा व जवळा हे गट गावे, लोकसंख्या व मतदारसंख्येनुसार सर्वांत मोठे आहेत. जामखेड संपुष्टात आल्यामुळे त्यातील काही गावे या दोन्ही गटांत विभागली गेली. जवळा गट १५ वषार्पांसून भाजपला साथ देणारा आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा वारे यांनी भाजपला धोबीपछाड देत बाजी मारली होती. मागील पाच वर्षांतील राजकीय समीकरणे पाहता तसेच लोकप्रतिनिधी प्रा. राम शिंदे दीड वर्षांपासून मंत्रिमंडळात आहेत. त्यांनी अनेक वर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरघोस निधी आणला आहे. गट राखीव झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली आहे. जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय वारे, प्रदीप पाटील, बापूराव ढवळे, नरेंद्र जाधव, बबन तुपेरे ही मंडळी सक्रिय आहे. पण ते गट जिंकण्याऐवजी हळगाव गण जिंकण्यासाठी बळ देतील. मागील पाच वर्षांत ठोस कामे नाहीत व तोलामोलाचा उमेदवार आर्थिक दृष्टीने संपन्न नसल्यामुळे गट डळमळीत झाल्याचे दिसते. ऐन निवडणुकीत तिकीट वाटपावरून कोण? कोठे?, जाईल याची नेम नाही. माजी जि. प. सदस्यांचे पती बबन तुपेरे, फक्राबादचे सरपंच विठ्ठल जगताप इच्छुक आहेत. या गटात शिवसेना, मनसे, रिपाइं यांचे प्राबल्य भाजप, राष्ट्रवादीला सतावणारे आहे. रिपाइंचे (आठवले) जिल्हाध्यक्ष सुनील साळवे या गटातून इच्छुक आहेत. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. तसेच जलसंधारणमंत्री राम शिंदे या मतदारसंघात आहेत. अनुसूचित जाती व जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. साळवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याशी वैयक्तिक असलेले संबंध पाहता आठवले वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून साळवे यांना न्याय देतील, अशी भीमसैनिकांत आशा आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण कानडे जवळा जि. प. गटात वैयक्तिक कामाच्या माध्यमातून लक्ष वेधून घेत आहेत. पाटोदा, अरणगाव, खामगाव, गिरवली, डोणगाव, नान्नज, हळगाव या परिसरात कार्यकर्त्यांची उभारलेली वेगळी फळी आहे. तसेच सर्वच पक्षांतील नेते, कार्यकर्ते, यांच्याशी जवळचा संपर्क व सहकार्य आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी सततचा असलेला संपर्क व राज ठाकरे यांनी ही निवडणूक जिंकायची या दृष्टीने पाठबळ देण्याचे जाहीर केले. लक्ष्मण कानडे सर्वांपेक्षा उजवे ठरण्याची शक्यता आहे. जवळा गटात भाजपकडून चोंडीचे सरपंच अभिमान सोनवणे, कविता शिंदे, संतोष भवाळ यांचे नाव चर्चेत आहे. प्रमुख पक्ष असलेला शिवसेना या गटातून प्रबळ उमेदवाराचा शोध घेत आहे. तसेच जवळा गटापुरती मनसे बरोबर युती होईल, याबाबत चर्चेच्या फेऱ्या चालू आहेत.