पाच वर्षांत मसाल्याचे दर दुपटीने वाढले आहेत. कोरोनाकाळात मसाले पदार्थ महागल्याने स्वयंपाकघरातील बजेट कोलमडले आहे. मसाले असतील तरच भाजीला चव येते. महाग का होईना मसाल्यांचा वापर करावाच लागतो.
-सोनाली धामणे-कोरडे
-----------------
मसालेच काय किचनमध्ये रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तू महागली आहे. मसाले सोडून स्वयंपाक करणे अवघड आहे. लसूण, अर्द्रक, कांदे, मिरची, हळद, खसखस अशा सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे स्वयंपाकाचा खर्च आता मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
-अदिती शिरसूल-सब्बन
------------
गेल्या दीड वर्षात मसाल्याच्या पदार्थांच्या आयातीवर परिणाम झालेला आहे. इतर देशातून येणारे बदामफूल, रामपत्री, खसखस यासारखे मसाल्याचे पदार्थ वाढले आहेत. खान्देशी मसाला वाढला आहे. इतर नामांकित पँकिंगच्या मसाल्यांचे दर स्थिर आहेत. खडा मसाल्याचे दर वाढलेले आहेत.
-आप्पासाहेब शिदोरे, नवनागापूर
----------
शेतकरी वर्गात चार-सहा महिने पुरेल इतका खडा मसाला एकत्रित घेण्याची पद्धत आहे. पूर्वी साधारण एकत्रित मसाला ८०० ते १०० रुपयांमध्ये मिळायचा. आता भाव वाढले आहेत. तोच मसाला आता दीड हजारापर्यंत जातो. तरीही विक्री मात्र घटलेली नाही.
-सुखदेव दरेकर, किराणा दुकानदार
----------
डमी क्रमांक- १०६७