शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक सलोखा हे जिल्ह्याचे वैशिष्ट्य : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 11:37 IST

सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

अहमदनगर : सामाजिक सलोखा हे आपल्या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे, ते सर्वांनी मिळून कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.महाराष्ट्र दिनाच्या ५९ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंडवर झाला. त्यानंतर केलेल्या भाषणात ते बोलत होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील आदींची यावेळी उपस्थिती होती.यावेळी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली. त्यानंतर शानदार संचलन झाले. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी संचलनाची पाहणी केली. पालकमंत्री शिंदे म्हणाले, आपला जिल्हा हा संतांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. हा वारसा आणि परंपरा आपण सर्वांनी जपली पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी परेड कमांडर परिविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने शानदान संचलन केले. सूत्रसंचलन गीतांजली भावे यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7 वाजता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उप विभागीय अधिकारी उज्वला गाडेकर व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सावेडी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर