शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात स्मशानभूमीच्या जागेचा वाद उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:50 IST

अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद उफाळला. मात्र येडे यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करुन वादावर पडदा टाकला.

श्रीगोंदा : महानुभाव पंथाची दिक्षा स्विकारलेले गणेश उर्फ आबासाहेब रंगनाथ येडे (वय - ४२ रा. होळी गल्ली, श्रीगोंदा) यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या जागेवरून वाद उफाळला. मात्र येडे यांच्या नातेवाईकांनी स्वत:च्या शेतात अंत्यसंस्कार करुन वादावर पडदा टाकला.गणेश यांचा मृतदेह दफन करण्यासाठी खंडोबा मंदिराजवळील स्मशानभुमीत आणला. मात्र काही मंडळींनी मृतदेह दफन करण्यासाठी विरोध केला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तब्बल चार तासांनी पोलिस बंदोबस्तात गणेश येडे यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. वादापुर्वी पोलिस उपनिरीक्षक निलेश कांबळे पोलिस पथकासह स्मशानभुमीत दाखल झाले. गणेश येडे यांचे दफन करू द्या, अशीही विनंती विरोध करणारांना कांबळे यांनी केली. तहसीलदार महेंद्र महाजन व मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांच्याशीही चर्चा केली. तरी काही लोक अंत्यविधी करू देण्यास तयार नव्हते. पोलिस स्टेशन समोर दफन करा, अशी आक्रमक भुमिका विरोधकांनी घेतली. त्यानंतर गणेश यांच्या नातेवाईकांनीच आमच्यासाठी वाद घालू नका, असे म्हणत स्वत:च्या शेतात अंत्यविधी केला.याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, पोलीस उपनिरीक्षक निलेश कांबळे, गुलाबराव खेंडके, बापूसाहेब गोरे, एम.डी. शिंदे, राजू गोरे, अख्तरभाई शेख, नानासाहेब कोथिंबीरे,डॉ. अनिल घोडके, चंद्रकांत आमले, संतोष खेतमाळीस, संतोष इथापे, गणेश श्रीराम, सुरेश भंडारी यांनी येडे यांना श्रद्धांजली वाहिली.स्मशानभुमीसाठी जागेची मागणीअनेक पिढ्यांपासून खंडोबा मंदिरासमोरील स्मशानभुमीत गवळी, लिंगायत, महानुभाव पंथातील दफन संस्कार केले जातात. पण काही मंडळी याबाबत वाद घालत आहेत. आम्ही अल्पसंंख्याक असल्याने वाद करू शकत नाही, आम्हाला पालिकेने स्मशानभुमीसाठी जागा द्यावी, अशी मागणी या समाजातील मंडळींनी केली.स्मशानभुमीसाठी नवी जागाशहरातील आनंदकर मळ्यात साडेतीन एकर जागा हिंदू स्मशान भूमीसाठी राखीव आहे. त्यामधील अर्धा एकर जागा दफनभूमीसाठी दिली जाईल. त्यास कुंपनही करण्यात येईल.- मनोहर पोटे, नगराध्यक्ष, श्रीगोंदा

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा