शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नगर तहसील कार्यालयाचे लवकरच विभाजन

By admin | Updated: May 16, 2016 00:09 IST

अहमदनगर : नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे.

अहमदनगर : नगर तहसील कार्यालयाचे विभाजन करण्याबाबत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. तहसील कार्यालयाचे विभाजन करून शहरासाठी स्वतंत्र्य अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याबाबत मंत्री खडसे यांनी प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आहेत. प्रस्ताव मिळाल्यास त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे आश्वासन खडसे यांनी दिल्याची माहिती भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली आहे. महसूलमंत्री खडसे शनिवारी नगर येथे आले होते. त्यावेळी प्रा. बेरड यांनी खडसे यांच्याशी तहसील कार्यालयाच्या विभाजनाबाबत चर्चा केली. तसेच याबाबत निवेदन दिले. यावेळी माजी नगरसेवक सचिन पारखी, सदा देवगावकर, अ‍ॅड. युवराज पोटे यांची उपस्थिती होती.या निवेदनात म्हटले आहे, नगर शहर आणि तालुका एकाच तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे या कार्यालयावर कामाचा प्रचंड ताण येतो. नागरिकांना सेवा चांगल्याप्रकारे मिळत नाहीत. शहर आणि तालुक्याची लोकसंख्या दहा लाखाच्यावर गेली आहे. गतिमान प्रशासनासाठी अप्पर तहसील कार्यालय असणे आवश्यक आहे. शहर आणि तालुक्यातील नागरिक आणि विद्यार्थी यांनाही कार्यालय सोयीस्कर होईल.(प्रतिनिधी)