शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
5
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
6
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
7
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
8
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
9
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
10
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
11
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
12
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
13
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
14
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
15
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
16
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
17
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
18
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
19
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
20
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!

कर्मयोगाची शिकवण देणारी गीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 13:11 IST

गीता परिवाराच्या वतीने स्वामी श्री. गोविंदगिरी महाराज यांच्या ७१ व्या जन्मवर्षानिमित्त संगमनेरात ७१ हजार गीतेचे मुखोंद्गत अध्याय त्यांना भेट दिले जाणार आहेत. यानिमित्ताने स्वत: संपूर्ण गीता कंठस्थ करणारे गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांचे विचार. गीता जयंतीनिमित्त हा विशेष लेख.

गीता जयंती विशेष/  श्रीमद्भगवद गीता केवळ धर्मग्रंथ नाही तर मानवी जीवनमूल्यांचा तो आधार ग्रंथ आहे. भारतीय तत्वज्ञानाने जगाला दिलेली ती अनुपम भेट आहे. म्हणूनच या ग्रंथावर जगात सर्वाधिक टीका लिहिल्या गेल्या. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य, विनोबाजींची गीताई अशी कितीतरी नावे लिहिता येतील. सशस्त्र क्रांतिचा नारा देणा-या भगतसिंगपासून अहिंसेचा मंत्र देणा-या गांधीजींपर्यंत सर्वांनाच हा ग्रंथ प्रिय वाटला, मार्गदर्शक झाला. भगवद्गीता हा योगशास्त्रांना सोपे करून सांगणारा, नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलून पडलेल्या मनाला ऊर्जा देणारा आणि विवेक जागविणारा ग्रंथ आहे. अनेकांनी मला प्रश्न विचारला की भगवद्गीता वाचून त्याचा अर्थ समजून घेतला की झाले. गीता पाठ करण्याचे काय कारण? साखर केवळ दुधात घालून चालत नाही ती चमच्याने घोळवली तरच साखरेची गोडी दुधात विरघळते. त्याच प्रमाणे गीता केवळ वाचून कळाली तरी जीवनात घोळवायची असेल तर पाठांतर मदत करते. त्या निमित्ताने आपण पुन्हा पुन्हा ती समजावून घेतो. जीवनात जेव्हा द्वंद निर्माण होते तेव्हा परिवार, धर्म आणि क्षेत्र धर्म द्वंदात गोंधळलेल्या अर्जुनाला निमित्त करून सांगितलेली गीता आपल्यालाही पदोपदी मार्गदर्शन करते. मुलांना तर संस्कृत कळतही नाही मग केवळ पाठांतर करून काय उपयोग? असाही प्रश्न मला अनेकांनी विचारला. बालवयात स्मरणशक्ती तीव्र असते. पाठांतर पटकन होते. मोठेपणी पाठांतराला मर्यादा येतात. पण त्यावेळी समज वाढलेली असते. लहानपणी पाठ केलेले सर्व मोठेपणीही लक्षात रहाते. तेव्हा अर्थ कळाला की आपण लहानपणी हे पाठ करून ठेवले याचा मोठा आनंद मनाला झाल्याशिवाय राहत नाही. मला गीतेचे १८ अध्याय पाठ करायला तीन वर्ष लागली. मुलांनी केवळ पंधरा-वीस दिवसात दोन अध्याय सहज पाठ केलेत. बालवयात पाठांतराचा हा मोठा फायदा मिळतो. या शिवाय संस्कृत उच्चारणामुळे स्पष्ट उच्चार करण्याची सवय जडते. वाणी शुध्द होते. स्वरयंत्राला व्यायाम मिळून आवाजालाही धार लागते. गीता कर्मयोगाची शिकवण देते. सातत्याने सत्कर्म करत रहायला प्रेरित करते. निर्भयता, शुध्दता, स्वच्छता, ज्ञानोपासना, योगाचरण, व्यवस्थित रहाणे, दान, दमन, अर्पण, स्वाध्याय, तप, आर्जव, अहिंसा, सत्य, क्र ोध, त्याग, शांती, दया, अलोलुप्त्व, मार्दव, लज्जा, तेज, क्षमा, धैर्य, शुध्दता, निर्वेरता, निरभिमान अशा दैवी संपदा म्हणजेच जीवनातील सद्संस्कारांचे प्रतिपादन करते. बालवयात या संस्कार सिंचनाची सर्वाधिक  आवश्यकता असते. शालेय शिक्षणाला सदाचरणाच्या शिक्षणाची जोड असणे किती महत्त्वाचे आहे. याचे भान आता जगाला येऊ लागले आहे. भारतीय शिक्षण पध्दतीत संस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व होते. कितीही मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, पैसा कमावला तरीही मनाची शांती नसेल तर हे सर्व निरर्थक असते. मनाची शांती आणि समत्वाचे शिक्षण गीता देते. या दृष्टीने आजच्या प्रचंड स्पर्धेच्या युगात ‘सुख दु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ असे विचारांनी समत्व साधण्याचे प्रशिक्षण गीतेकडून मिळते. अंतरंग योगात प्रवेश कसा करावा याचे सुरेख विवेचन गीता करते. म्हणूनच गीतेचा अभ्यास सर्वार्थाने उपयुक्त आहे. एखाद्या ग्रंथाची जयंती साजरी व्हावी असा एकमात्र गं्रथ गीता आहे. आज गीता जयंतीच्या निमित्ताने या ग्रंथाचा परिसस्पर्श आपल्याही जीवनाला व्हावा, असा संकल्प प्रत्येकाने करायला हवा!- डॉ.संजय मालपाणी, गीता परिवाराचे प्रमुख, संगमनेर.

टॅग्स :SangamnerसंगमनेरAhmednagarअहमदनगर