शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालक प्रश्नावर लवकरच तोडगा काढू

By admin | Updated: August 27, 2014 23:09 IST

रिक्षा चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू ,अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.

राहाता : वाहनचालक परवान्याविषयी परिवहन विभागाने शिक्षणाची टाकलेली अट शिथील करण्याबाबत आपण परिवहनमंत्र्यांशी चर्चा केली असून, याबाबत योग्य तो मार्ग काढून रिक्षा चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू ,अशी ग्वाही कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.शिर्डी शहरात ईद मिलनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विखे बोलत होते. शहराचे उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, माजी उपनगराध्यक्ष कैलास सदाफळ, मौलाना सय्यद, मौलाना इब्राहीम, मौलाना अजगारी, सोपानराव सदाफळ, अ‍ॅड. रघुनाथ बोठे, गोपीनाथ गोंदकर, विष्णू थोरात, बाळासाहेब जपे, विनायक निकाळे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश निकाळे, तहसीलदार दळवी आदी याप्रसंगी उपस्थित होते.विखे म्हणाले की, सबका मालिक एक अशी शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या पुण्यभूमीत आपण सर्वजण एकत्रितपणे नांदत आहोत. मुस्लिम समाजाच्या प्रश्नासाठी आपण सातत्याने पुढाकार घेतला. शालेय शिक्षणमंत्री पदावर असताना राज्यात उर्दू शाळांना नवीन चेहरा प्राप्त करून देण्यासाठी आपण सातत्याने निर्णय घेतले. स्वतंत्र शिक्षण संचालक नेमून चार हजार उर्दू शाळांना अनुदान प्राप्त करून देण्याचा निर्णय घेतला़ शिक्षण हीच शक्ती आहे असे मानून वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिल्या. प्रवरा शिक्षण संकुलातून डॉक्टर आणि अभियंता झालेले अल्पसंख्यांक विद्यार्थी आता राज्यात ठिकठिकाणी यशस्वीपणे काम करीत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करतानाच राहाता शहरात कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा आपण निश्चितच विचार करू, असे ते म्हणाले. (वार्ताहर)रिक्षा बंद करण्याच्या निर्णयासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपण चर्चा केली. मात्र परिवहन विभागानेच वाहन चालक परवान्यासाठी आता शिक्षणाची अट घातलेली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण यांची भेट घेतली असून, लवकरच यावर तोडगा काढू़-राधाकृष्ण विखे, कृषिमंत्री