शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

साकळाई सिंचन योजना : 32 गावातील शेतकरी रस्त्यावर, चिखलीत रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 14:01 IST

नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यात सुमारे 32 गावांचे भविष्य असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या वतीने चिखली येथील जुना टोल नाका येथे आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सुमारे तीन हजार शेतकरी सहभागी झाले होते. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी बैलगाड्या घेऊन रस्त्यावर उतरले होते. सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली होती.साकळाई उपसा सिंचन योजना समितीचे अध्यक्ष झेंडे महाराज म्हणाले, आतापर्यत पुढा-यांनी भुलथापाच मारल्या आहेत. जनतेला झुलवत ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. शेतक-याच्या लढ्यात नगर - श्रीगोंदा तालुक्यातील पुढा-यांनी लढ्यात सहभाग न घेतल्यास त्यांचाही समाचार घेऊ असा इशारा त्यांनी दिला. आमदार राहुल जगताप म्हणाले, साकळाई योजना पूर्ण करण्यासाठी यापूर्वीही विधानभवनात आवाज उठवला आहे. या अधिवेशनातही आवाज उठवणार आहे. योजनेसाठी पक्षाचे नेते शरद पवार यांची सर्व मदत मिळवून देऊ. माजी सभापती बाळासाहेब हराळ म्हणाले, साकळाईसाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा द्या. नेत्यांच्या गाड्या आडवा. भाजपाचे नेते संतोष लगड म्हणाले, योजना मार्गी न लागल्यास सर्व पक्षातील नेत्यांनी पदाचे राजीनामे दिले पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी यावेळी लोकपाल व लोकायुक्त साठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्याचा ठराव मांडला. ‘अण्णा हजारे हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत ठराव मंजूर केला.यावेळी एकजूट करून लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. वेळप्रसंगी पदाचे राजीनामे देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. १० फेब्रुवारी रोजी रुईछत्तीसी येथे नगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अडविण्याचा इशारा दिला.यावेळी जेष्ठ समाजसेवक राजाराम भापकर, सभापती पुरुषोत्तम लगड, दादाभाऊ चितळकर, रामदास झेंडे, रवींद्र भापकर, सरपंच ज्ञानेश्वर कवडे, शरद बोठे, संजय धामणे, सरपंच अण्णा चोभे, सरपंच प्रवीण कोठुळे, नारायण रोडे, शरद चोभे, लहू कासार उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा