शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

अपंगांची जबाबदारी समाजाने घ्यावी

By admin | Updated: September 19, 2016 00:11 IST

संगमनेर : अपंगत्त्वाला बऱ्याचदा समाजव्यवस्थाही जबाबदार असते. विविध प्रकारच्या अपघातांमुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे

संगमनेर : अपंगत्त्वाला बऱ्याचदा समाजव्यवस्थाही जबाबदार असते. विविध प्रकारच्या अपघातांमुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अपंगांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही समाजानेच घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले़ ‘लोकमत’ने यासाठी घेतलेला पुढाकार हा प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. ‘लोकमत’, साधू वासवानी ट्रस्ट व लायन्स क्लब संगमनेर सफायरतर्फे येथील मालपाणी हेल्थ क्लबमध्ये रविवारी अपंगांना मोफत कृत्रिम हात-पाय (जयपूर फूट) बसविण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन करताना ते बोलत होते. लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष गिरीष मालपाणी, सचिव मिलिंद पल्लोड, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, साधू वासवानी मिशनचे समन्वयक मिलिंद जाधव, डॉ़ सलील जैन, डॉ़सुशांत राऊत, डॉ़ राहुल सरोज, जितेंद्र राठोड, ज्ञानेश्वर पाटील, सुशिल ढगे आदी उपस्थित होते़ ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व़ जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिबिराचे उद्घाटन झाले. दगडात देव शोधण्यापेक्षा माणसात देव शोधला तर समाजहिताचे मोठे काम उभे राहते. राज्यात आघाडीचा माध्यमसमूह असलेल्या ‘लोकमत’ने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. हे शिबिर अपंगांच्या जीवनाला उभारी देणारे आहे. समाजात अनेक अपंग व्यक्ती आपणातील कमतरतांवर मात करुन यशस्वी होतात. त्यांच्या पाठिशी समाजाने उभे रहायला हवे, असे आवाहन त्यांनी केले. संगमनेर लायन्स क्लब तसेच साधू वासवानी मिशनच्या कार्याचे यावेळी त्यांनी कौतूक केले. प्रारंभी लंके यांनी प्रास्ताविकात शिबिराच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. नगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील अपंग व्यक्ती शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शिबिरात कृत्रिम हाय-पाय बसविण्यासाठी मोजमाप घेण्यात आले. संगमनेर येथेच दीड महिन्यानंतर प्रत्यक्षात अवयव बसविले जाणार आहेत. सूत्रसंचालन प्रा. संदिप सातपुते यांनी केले. विलास गुंजाळ यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)‘लोकमत’ हे जिल्ह्यासह महाराष्ट्रात घराघरात वाचले जाणारे वृत्तपत्र आहे़ प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम या वृत्तपत्र समूहाच्या माध्यमातून थेट लोकांपर्यंत पोहोचतात़ लोकमत,साधू वासवानी मिशन आणि लायन्स क्लब संगमनेर सफायर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले जयपूर फूट शिबिर अपंग बांधवांसाठी लाभदायी ठरणार आहे़ ‘लोकमत’च्या सहभागामुळे राज्यभरात शिबिराविषयी माहिती झाली़ त्यामुळे या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़ अपंगत्व नशिबी आलेल्यांना समाजाच्या आधाराची गरज आहे़ हा आधार देण्याचे काम लायन्स क्लब गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे़-गिरीष मालपाणी, संस्थापक अध्यक्ष, लायन्स क्लब, संगमनेर सफायर.