शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये समाजकल्याण अधिका-याला काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 15:44 IST

राज्यातील शोषित, वंचित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावा, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सुरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याने शनिवारी चर्मकार उठाव संघाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिका-याला काळे फासण्यात आले.

अहमदनगर : राज्यातील शोषित, वंचित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे प्रश्न मार्गी लावा, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून सुरज दुर्गिष्ट या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याने शनिवारी चर्मकार उठाव संघाच्या वतीने जिल्हा समाजकल्याण अधिका-याला काळे फासण्यात आले.सुरज शंकर दुर्गिष्ट (रा. तरवडी, ता. नेवासा) हा सामान्य मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी असून, त्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. गावातील लोकांनी वर्गणी करून त्याच्या शिक्षणासाठी मदत केली. त्याला शिष्यवृत्ती मिळावी म्हणून चर्मकार संघाने जिल्हा समाजकल्याण कार्यालयाकडे पाठपुरावा केला. सप्टेंबर २०१७मध्ये समाजकल्याण अधिका-यांना निवेदन देऊन शिष्यवृत्ती मिळावी, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला होता. परंतु गेल्या अडिच महिन्यांपासून यावर काहीही कार्यवाही न झाल्याने अखेर शनिवारी चर्मकार संघाच्या कार्यकर्त्यांनी बोल्हेगाव फाटा येथील जिल्हा समाजकल्याण गाठले. सुरज हा हुशार विद्यार्थी आहे, परंतु केवळ पैशाअभावी त्याला शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. त्याला अद्याप एका रूपयाचीही शिष्यवृत्ती मिळालेली नाही. शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे, तसेच प्रस्तावित जुगाडू व्यवस्थेमुळे राज्यातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. याविरूद्ध जाहीर उठाव आंदोलन करून कार्यकर्त्यांनी समाजकल्याण अधिकारी पांडुरंग वाबळे यांच्या अंगावर शाई टाकून काळे फासले. आंदोलनात अशोक कानडे, विजय घासे, बाळासाहेब गायकवाड, गौतम सातपुते, बाळासाहेब भोसले, रावसाहेब कानडे, माणिकराव नवसुपे, संतोष कानडे, प्रकाश पोटे, रामेश्वर सिंह, सोपान वाढे आदींहस कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर