अहमदनगर : कोणतीही चळवळ उभी करायची असेल तर शिक्षणापेक्षाही सामाजिक भान असणे अधिक गरजेचे आहे. गावाचा विकास करायचा असेल तर त्यासाठी गावपातळीवरील पंचायत राज अधिक सक्षम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.
पुण्याच्या यशदा प्रशिक्षण संस्थेमार्फत तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणाचा गत आठवड्यात समारोप झाला. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्यावतीने पोपटराव पवार यांचा ग्राहक पंचायतीचे अहमदनगरचे अध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पवार यांना ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र- माहिती व कार्यपुस्तिका’ आणि डॉ. राजेंद्र धामणे यांच्या मनगाव येथील माउली या संस्थेच्या महिलांनी तयार केलेली सुगंधित अगरबत्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायत कोल्हापूरचे अध्यक्ष बी. जे. पाटील, यशदाचे विशेष प्रशिक्षक श्रीमती अनिता महिरास, डाॅ. भाऊसाहेब महिरास, प्रशिक्षक कैलास पठारे, हरीश जाधव, शासनाच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वायगणकर, हिवरेबाजार प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक हबीब सय्यद, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे माजी व्यवस्थापक नरेश पांडव आदी उपस्थित होते.
यावेळी पोपटराव पवार यांनी तीस-चाळीस वर्षात हिवरे बाजारचा कायापालट ते एका सरपंचाचा ‘पद्मश्री’ पुरस्कारापर्यंतचा प्रवासही उपस्थिताना सांगितला. त्यांचा हा प्रवास ऐकून उपस्थित भारावले.
फोटो- ३० ग्राहक पंचायत
ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्यावतीने पोपटराव पवार यांचा सत्कार करताना ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर. समवेत बी. जे. पाटील, नरेश पांडव, मधुकर वायंगणकर, अनिता महीरास, डॉ. भाऊसाहेब महीरास, हरीश जाधव आदी.