शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीपासून राळेगणमध्ये समाजसेवक अण्णा हजारे यांचे पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:30 IST

शेतकऱ्यांचे प्रश्न , लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने केली नाही, तर येत्या गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केंद्र सरकारला तिसरे स्मरणपत्र पाठवून दिला आहे.

राळेगण सिद्धी : शेतकऱ्यांचे प्रश्न , लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीबाबत केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता तातडीने केली नाही, तर येत्या गांधी जयंतीला २ आॅक्टोबरपासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी केंद्र सरकारला तिसरे स्मरणपत्र पाठवून दिला आहे.देशातील प्रत्येक राज्य कृषी मूल्य आयोगाकडून आलेल्या शिफारशींमधील ४० ते ५० टक्के कपात केंद्रिय कृषी मूल्य आयोगाकडून केली जाते. शेतकºयांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विभागाचा हस्तक्षेप टाळावा. केंद्रिय कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देण्याचे आश्वासन पाळावे, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंह यांना हजारे यांनी याबाबत बुधवारी पत्र पाठविले. नवी दिल्ली येथे शहीद दिनापासून (दि. २३ मार्च) केलेल्या उपोषणाच्या सातव्या दिवशी केंद्र सरकारने मागण्यांसदर्भात आश्वासनांची पूर्तता करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हजारे यांनी उपोषण सोडले होते. या आश्वासनानुसार केंद्र सरकारची काय कार्यवाही सुरू आहे?, याची माहिती आपणाला अद्याप मिळाली नसल्याचे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी केंद्रिय कृषी मूल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासंदर्भात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्येक राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचा अहवाल केंद्रिय आयोगाकडे जातो. त्यात केंद्रिय आयोग ४० ते ५० टक्के कपात करतो. कारण, कृषी विभागाचा हस्तक्षेप होतो. केंद्रिय कृषी मूल्य आयोगात तीन अनुभवी शेतक-यांचा समावेश असला पाहिजे.सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा फटकारले असतानाही केंद्र सरकारची लोकपाल व लोकायुक्त नियुक्ती न करण्याची कृती अशोभनीय आहे. न्यायालयाने दहा दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. सरकारच सर्वोच न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करीत नसेल तर हा न्यायालयाचा अवमान आहे. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे