शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

..म्हणून मी लय वेड्यावाणी करते! श्रीगोंद्याच्या पूनम तुपेचा टिकटॉकवर जलवा; व्हिडिओंना ५० लाख लाईक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:30 IST

श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाºया पूनम संजय तुपे यांचा ‘..म्हणून मी लय वेड्यावाणी करते’, हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच गाजतो आहे. वर्षभरात पूनम यांच्या विविध व्हिडिओंना ५० लाख ‘लाईक्स’ मिळाले तर त्यांचे १ लाख ६८ फॉलोअर्स आहेत.

बाळासाहेब काकडे / श्रीगोंदा : तालुक्यातील पिसोरेखांड येथील कोंगजाई डोंगर पायथ्याशी राहणाºया पूनम संजय तुपे यांचा ‘..म्हणून मी लय वेड्यावाणी करते’, हा टिकटॉक व्हिडिओ राज्यभर चांगलाच गाजतो आहे. वर्षभरात पूनम यांच्या विविध व्हिडिओंना ५० लाख ‘लाईक्स’ मिळाले तर त्यांचे १ लाख ६८ फॉलोअर्स आहेत.पूनम यांचे मूळगाव इंदापूर तालुक्यातील वरकुटे. शिक्षण सातवीपर्यंत झाले आणि २००८ मध्ये पिसोरेखांड येथील संजय तुपे यांच्याशी विवाह झाला. संजय हे श्रीगोंदा येथे एका किराणा दुकानात हमाली करतात. पूनम या शिलाई मशीनचे काम करतात. त्यांना किरण, अपूर्वा, शिवन्या या तीन मुली आहेत.घरी अठराविश्व दारिद्रय. राहण्यास साधे पक्के घरीही नाही. निवारा म्हणून आहे ते साधे छप्पर. पूनम यांनी काही दिवसांपूर्वी सचिन देवकुळे यांच्याकडून टिकटॉक अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर मराठी, हिंदी गाण्याचे व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली. पूनम यांचे व्हिडिओ पाहून काहींनी ‘बया जरा वेडी आहे, बधीर आहे’ अशी टिंगल केली. त्यावर पूनम यांनी  ‘..म्हणूनच मी लय वेड्यावाणी करते’, हा व्हिडिओ टिकटॉकवर टाकला. त्यानंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पूनम दररोज पाच व्हिडिओ टाकतात. या कामात पती संजय मदत करतात. पूनम यांच्या व्हिडिओंना ५० लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या असून त्यांचे १ लाख ६८ हजार फॉलोअर्स आहेत. पूनम यांच्याकडे कोणतेही तंत्रज्ञान नाही. त्यांना पती सोडता कोणाचे सहकार्यही नाही. तरी त्या व्हिडिओ बनविण्याचे काम स्वत:च करतात. केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि सातत्य याच्या बळावर ते नित्यनियमितपणे दररोजच्या जीवन संघर्षावर आधारित व्हिडिओ बनवितात.वेडेपणातही आनंदच.. मला लोक वेडी म्हणायचे. शहाणं होऊन राहण्यापेक्षा वेड होऊन राहण्यात मला आनंद मिळतो. काही जण माझ्या विरोधात कमेंट टाकतात. या कमेंटमधूनच माझ्या नवीन व्हिडिओचा जन्म होतो. यातून मला ऊर्जा मिळते, असे पूनम तुपे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाTik Tok Appटिक-टॉक