शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBKS vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ५६ मि़ मी़ पाऊस

By admin | Updated: July 11, 2014 00:56 IST

अहमदनगर: गेल्या एक महिन्यापासून पावसाने ताण दिला होता़ जून पूर्णपणे कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे़ सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने सर्वांनाच देव आठवू लागले होते़

अहमदनगर: गेल्या एक महिन्यापासून पावसाने ताण दिला होता़ जून पूर्णपणे कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे़ सोसाट्याचा वारा वाहू लागल्याने सर्वांनाच देव आठवू लागले होते़ सामान्यांसह सरकारी यंत्रणाही धास्तावली होती़ मात्र उशिरा का होईना, पण नगर शहरासह जिल्ह्यात हलक्या सरींनी पावसाचे आगमन झाले असून, बुधवारी जिल्ह्यात सरासरी ४ मि़ मी़ पावसाची नोंद झाली आहे़ सर्वसाधारणपणे नगर जिल्ह्यात ७ जूनला मान्सूनचा पाऊस पडतो़ मान्सून वेळवरच बरसणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता़ मात्र हवामान खात्याचे अंदाज मोडीत काढत जूनमध्ये मान्सून पडलाच नाही़ जून कोरडा गेल्याने चिंता वाढली़ जुलैच्या पहिल्या आठवड्यातही पावसाचा पत्ता नव्हता़ परिणामी धरणांत नवीन पाणी आलेच नाही़ जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व भंडारदरा धरणाने तळ गाठला आहे़ धरणांत नवीन पाण्याची आवक होईल, असा पाऊस झाला नाही़ त्यामुळे धरणांची स्थिती जैसे थे आहे़ परंतु गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, पावसाचे धिम्या गतीने आगमन झाले़ उशिरा का होईना, पण पावसाला सुरुवात झाली आहे़ पावसाची झड सुरू असून, जिल्ह्यात सरासरी ४़ ३० मि़ मी़ पाऊस झाला आहे़ त्यात सर्वाधिक पावसाची नोंद नेवासा तालुक्यात झाली आहे़शहरात दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली़ आकाशात काळे ढग दाटून आले़ दुपारनंतर झालेल्या पावसाने सखल भागात पाणी साचले होते़ राहुरी तालुक्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला़ तर श्रीगोंदा तालुक्यात ९ मि़ मी़ पाऊस पडला आहे़ इतर ठिकाणीही रिमझिम पाऊस पडला़ जोराचा नसला तरी भिज पाऊस सर्वत्र पडत आहे़ आणखी पाऊस होईल, या अपेक्षेने पेरणीची लगबग सुरू झाली आहे़ भिज पाऊस झाल्याने उत्तर नगर जिल्ह्यात कपाशीच्या लागवडीला सुरुवात झाली असून, बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे़ मात्र जोरदार पावसाची अजूनही बळीराजाला प्रतीक्षा आहे़ (प्रतिनिधी)