अहमदनगर : नगर शहरातून स्विफ्ट कारमधून विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा व तंबाखूची तस्करी होत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तिघा आरोपींसह ९ लाख ८० हजार ९६८ रुपयांचा गुटखा पानमसाला, तंबाखू व कार जप्त करण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.
अनंत विलास भालेकर (वय ३९), जमीन अब्दुल सत्तार मुल्ला (वय ३८) व अविनाश चंद्रकांत हलकारे (वय ३० रा. तिघे तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) असे अटक केलल्या आरोपींचे नाव आहे. नगर शहरातून गुटख्याची तस्करी होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली होती. शहरातील स्टेट बँक चौकात सहायक निरीक्षक इंगळे, दिवटे, सहायक फौजदार मन्सूर सय्यद, हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे, संदीप घोडके, संदीप पवार, पोलीस नाईक शंकर चौधरी, रविकिरण सोनटक्के, कमलेश पाथरुट आदींच्या पथकाने सापळा लावून कार ताब्यात घेऊन तपासणी केली तेव्हा त्यात गुटखा व तंबाखू आढळून आली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
फोटो -०८ गुटखा
ओळी- कारमधून गुटखा, पानमसाल्याची तस्करी करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली.