शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; तिघांना जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 17:53 IST

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव शिवारातील चिचकूट वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला करून दरेकर परिवारातील तिघांना जबर मारहाण करून जखमी केले. ...

आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव शिवारातील चिचकूट वस्तीवर दरोडेखोरांनी हल्ला करून दरेकर परिवारातील तिघांना जबर मारहाण करून जखमी केले. त्याच टोळीने कोकणगाव शिवारातील संतोष संपत शिंदे यांच्या घरावर हल्ला केला. पोलिसांची गाडी आल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोरांनी पळ काढल्यामुळे शिंदे यांची मारहाण वाचली.मध्यरात्री हिरडगाव येथील चिचकूट वस्तीवरील हरिभाऊ भाऊसाहेब दरेकर परिवारासह हॉलमध्ये झोपलेले असता पाच दरोडेखोरांनी दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. शेजारच्या खोलीत उचकापाचक सुरु केल्यावर आवाजाने जागे झालेल्या हरिभाऊ आणि त्यांची पत्नी राणी यांना लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसºया खोलीत झोपलेल्या आई - वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर दरोडेखोरांनी धूम ठोकली. त्यामध्ये सात तोळे सोने आणि सहा हजार रोख रक्कम असा ऐवज लंपास केला. दरेकर दांपत्य जबर जखमी झाले आहेत.याच टोळीने जवळच असलेल्या कोकणगाव शिवारातील संतोष संपत शिंदे यांच्या घराकडे मोर्चा वळविला. दगडाने दरवाजावर प्रहार करत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. शिंदे यांच्या आई सुमन, पत्नी सारिका, वडील यांना मारहाण केली. असेल तेवढा ऐवज द्या अन्यथा मुलगी सानिका ( वय ११ वर्षे ) हिचा जीव घेऊ असे धमकावले. चिचकूट वस्तीवरील हल्ल्यानंतर पोलीस पथकाने रस्त्याच्या कडेला असलेल्या शिंदे यांना सावध करण्याच्या दृष्टीने त्यांच्या घराकडे गाडी वळवली. गाडी पाहताच दरोडेखोरांनी धूम ठोकली. स्थानिकांसह पोलिसांनी पाठलाग केला पण अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाले. शिंदे यांच्या घरात झाडाझडती घेऊन दोन तोळे सोने आणि १७ हजार रोख रक्कम लंपास केली. जखमींच्या मदतीसाठी प्रशांत दरेकर, मिलिंद दरेकर, नवनाथ दरेकर, देवराम दरेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर