शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावातील नगदवाडीत छपरातील जमिनीतून आगीसह धूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 16:39 IST

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, नगदवाडी परिसरात छपरात रहात असलेल्या दाट लोकवस्तीतील मोरे यांच्या घरात सोमवारी दुपारी जमिनीतून धूर व आग बाहेर पडत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले.

चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी, नगदवाडी परिसरात छपरात रहात असलेल्या दाट लोकवस्तीतील मोरे यांच्या घरात सोमवारी दुपारी जमिनीतून धूर व आग बाहेर पडत असल्याचे येथील नागरिकांनी पाहिले. हा लाव्हारस तर नाही ना? या भितीने नागरिक भयभीत झाले. सदर घटनेची माहिती महसूल विभागाला कळल्यानंतर कामगार तलाठी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.नगदवाडी येथे सोमवारी दुपारी दोन वाजता बाळू गंगाधर मोरे यांच्या घरात अचानक जमिनीतून धूर निघू लागला. ही घटना घरात रहात असलेल्या मोरे व त्यांच्या कुटुंबाला कळाली. त्यांनी ताबडतोब स्थानिक नागरिकांना आवाज देत ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. शरद त्रिभुवन, नाना बत्तीशे, राधाची माळी, माजी सरपंच विजय जगताप आदींसह सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. घरात धूर निघत असल्याची बातमी सोनवडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घराबाहेर बघ्यांनी एकच गर्दी केली. पोलीस पाटील दगू गुडघे, सरपंच गंगाराम खोमणे यांनी याबाबतची माहिती प्रशासनाला कळविली. घरात असलेल्या अर्चना मोरे या लहान मुलीच्या हात,पायाला भाजले आहे. भीमा माळी, शरद त्रिभुवन यांचे हातही या उष्ण वाफेमुळे भाजले. नागरिकांनी जिथे धूर निघत होता तेथे खोदकाम केले, परंतु तेथे कोणत्याही स्वरूपाची वस्तू व इतर काही गोष्ट आढळून आली नाही. धूर नैसर्गिक असल्याचे प्रत्यक्षदर्शींना जाणवले. एकीकडे खोदल्यानंतर दुसºया ठिकाणीही धूर निघायला सुरूवात झाली. याठिकाणी ताबडतोब नागरिकांनी पाणी ओतून ती जागा भिजवून काढली. मग काही वेळाने तेथील वातावरण शांत झाले.वरिष्ठ पातळीवर तपासणी करणारकामगार तलाठी दत्तात्रेय बिन्नर आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. हा धूर कशामुळे निघाला? याची तपासणी वरिष्ठ पातळीवर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही या घटनेच्या बाबतीत नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय