शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राहाता नगरपालिकेसमोर स्माईल फाऊंडेशनचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 12:28 IST

राहाता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून एका मनोगोरुग्णास कचरा डेपोत सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१०) घडला होता.

राहाता : राहाता नगरपालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून एका मनोगोरुग्णास कचरा डेपोत सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.१०) घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी राहाता नगरपालिकेसमोर सोमवारी रात्री उशीरा धरणे आंदोलन केले.राहाता नगरपालिकेचा घनकचरा वाहतूक करणा-या ट्रॅक्टर ट्रॉलीतून नेऊन एका मनोरुग्ण व्यक्तीला कचरा डेपोत सोडल्याचा प्रकार समाज माध्यमाद्वारे व्हायरल झाला होता. त्यानंतर सोमवारी राहाता येथे स्माईल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भेट देवून घटनेची चौकशी केली. मुख्याधिकारी बारींद्रकुमार गावीत यांच्याशी त्यांनी संपर्क साधला असता ते बाहेर गावी असल्यामुळे येवू शकत नसल्याचे मुख्याधिका-यांनी सांगितले.घटना घडून दोन दिवस होवूनही पालिका प्रशासनाने संबंधित कर्मचा-याविरुद्ध कोणतीही कारवाई न केल्याच्या निषेधार्थ स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे व त्यांच्या सहका-यांनी पालिका कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले. मुख्याधिकारी संबंधित कर्मचा-यांना निलंबीत करत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार मालखरे यांनी व्यक्त केला. धरणे आंदोलनात सुमन ठाकरे, गणेश चावरे, कोमल गोर्डे, योगेश सोनवणे, महेश बागडे, विशाल चव्हाण, सागर मुळे, अमित भिंगारदिवे, राहुल घंगाळे, संतोष तावरे, कार्तिक त्रिंबके, हृतिक त्रिंबके आदींसह त्यांचे कार्यकर्ते सहभागी आहे. राहाता नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, सागर लुटे, सचिन गाडेकर, बाळासाहेब गिधाड, दशरथ तुपे, किरण वाबळे, राज लांडगे यांनी या धरणे आंदोलनास पाठींबा दिला.

हा प्रकार दुर्दैवी आहे. दुस-या दिवशी रविवारची सुट्टी होती. सोमवारी (दि.१२) संबंधीत कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीसा काढल्या आहेत. त्यांचे म्हणणे आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल. घटलेली घटना निंदनीय असून ती समर्थनिय नाही. कर्मचारी दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल.-बारींद्रकुमार गावीत, मुख्याधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरrahaataराहाता