शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झोपलेल्या व्यक्तीच्या शर्टात घुसला साप : जिल्हा रुग्णालयातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:05 IST

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात झोपलेल्या एका व्यक्तीच्या शर्टमध्ये साप आढळल्याची घटना १५ जूनच्या पहाटे घडली़

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात झोपलेल्या एका व्यक्तीच्या शर्टमध्ये साप आढळल्याची घटना १५ जूनच्या पहाटे घडली़ या घटनेचा व्हिडिओ शनिवारी सर्वत्र व्हायरल झाला़ अतिदक्षता विभागाचा दरवाजा नेहमी बंद असतानाही हा साप आतमध्ये गेला कसा, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे़मागील शनिवारी (दि़१५) पहाटे साडेतीन वाजता सर्पमित्र आकाश गोसावी यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका शेतकऱ्याच्या शर्टमध्ये साप घुसल्याची माहिती फोन वरुन मिळाली़ त्यांनी तात्काळ जिल्हा रुग्णालय गाठून त्या शेतकºयाच्या शर्टमधून साप बाहेर काढला़ या घटनेचा सर्पमित्र गोसावी यांनी व्हिडिओ बनवून युट्यूबवर अपलोड केला़ शनिवारी व्हॉटस्अ‍ॅपवरुन हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला़ त्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले़ समाज माध्यमावर जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर टीकाही होऊ लागली़जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा दरवाजा नेहमी बंद असतो, मग हा साप आतमध्ये गेला कसा, तो आतमध्ये जाताना कोणीच पाहिला कसा नाही आणि थेट त्या शेतकºयाच्या शर्टमध्ये घुसतानाच कुणी पाहिला, साप शर्टमध्ये घुसल्यानंतरही त्या व्यक्तीला जाग कशी आली नाही, असे प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले़ ज्या व्यक्तीने सर्पमित्र गोसावी यांना फोनवरुन माहिती दिली, तो व्यक्ती कोण ही माहितीही समजू शकली नाही़दरम्यान या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेबाबत मला काहीही माहिती नाही़ त्या काळात मी सुट्टीवर होतो, असे सांगितले़ इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनाही या घटनेबाबत काही माहिती नव्हती़‘त्या’ कर्मचा-यांवर कारवाई करणार का?अतिदक्षता विभागात शर्टमध्ये साप घुसलेला व्यक्ती एका रुग्णाचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते़ पण त्या व्यक्तीला अतिदक्षता विभागात खाली फरशीवर झोपण्याची परवानगी कशी दिली? यातून काही दुर्दैवी घटनाही होऊ शकते़ त्यामुळे अतिदक्षता विभागात नातेवाईकांना झोपण्यास परवानगी देणाºया आणि साप आत येईपर्यंत दुर्लक्ष करणाºया कर्मचाºयांवर जिल्हा शल्य चिकित्सक काय कारवाई करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे़मला एका अज्ञात व्यक्तीने जिल्हा रुग्णालयात साप निघाल्याची माहिती दिली़ मीही त्या व्यक्तीला नाव विचारले नाही़ त्या सर्व घटनेचा मी व्हिडिओ तयार केला आहे़ तो साप बिनविषारी आहे़ हे साप नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोठेही आढळतात़ साप पकडला त्यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या नर्स होत्या़ त्यांनी याबाबत डॉक्टरांना माहिती दिली की नाही, हे मला माहिती नाही़ पण मी तो साप पकडून जंगलात मुक्त केला आहे़ -आकाश गोसावी, सर्पमित्र

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर