शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

संगमनेरमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल

By शेखर पानसरे | Updated: May 16, 2023 16:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे ४५० किलो ...

लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई करत १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे ४५० किलो गोमांस जप्त केले. मंगळवारी (दि. १६) पहाटे शहरातील जमजम कॉलनी येथील पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

     राजीक रज्जाक शेख (रा. संगमनेर) याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉस्टेबल महादू किसन खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल असलेला शेख पसार आहे. जमजम कॉलनी परिसरात गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याबाबत माहिती मिळाल्याने शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासमवेत सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार, पोलिस कॉस्टेबल खाडे आदी कर्मचारी तेथे पोहोचले.

एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल सुरू होती. पोलिस आल्याचे पाहून राजीक शेख हा पळून गेला. पोलिसांनी गोमांस जप्त करत ते नष्ट केले. गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक गजानन गायकवाड अधिक तपास करीत आहेत.