शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यात सहा तालुके शिवथाळीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:59 IST

अहमदनगर : प्रत्येक तालुक्यात शिवथाळी केंद्र सुरू करण्याच्या शासन निर्णयाला जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी अद्यापही प्रतिसाद न दिल्याने येथे शिवथाळीचा घास गरजूंच्या मुखापर्यंत गेलेला नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहाता व संगमनेर या सहा तालुक्यांत तेथील तालुका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शिवथाळीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : प्रत्येक तालुक्यात शिवथाळी केंद्र सुरू करण्याच्या शासन निर्णयाला जिल्ह्यातील सहा तालुक्यांनी अद्यापही प्रतिसाद न दिल्याने येथे शिवथाळीचा घास गरजूंच्या मुखापर्यंत गेलेला नाही. पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीरामपूर, राहाता व संगमनेर या सहा तालुक्यांत तेथील तालुका प्रशासनाच्या उदासिनतेमुळे शिवथाळीला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख केल्याप्रमाणे गरजूंना १० रूपयांत भोजन देण्याचा शब्द सरकार स्थापन केल्याबरोबर खरा केला. प्रारंभी जिल्ह्याच्या ठिकाणी १० रूपयांत जेवण देण्याची व्यवस्था करून याला शिवथाळी असे नाव देण्यात आले. नगर शहरात मार्चपर्यंत १० केंद्रांवर ही शिवथाळी सुरू करण्यात आली. परंतु पुढे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब जनता भुकेली राहू नये, यासाठी या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याप्रमाणे १ एप्रिलपासून प्रत्येक तालुक्यात दीडशे थाळी व जिल्ह्याच्या ठिकाणी असणाºया केंद्रांवर थाळीसंख्या दुप्पट करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकाºयांच्या अधिपत्त्याखाली हे काम सुरू असून त्यांनीही आदेश देत प्रत्येक तहसीलदारांना ही केंद्र सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आठ तालुक्यांत ही केंद्रे सुरू झाली, मात्र दीड महिना लोटला तरी पाथर्डी, शेवगाव, जामखेड, संगमनेर, श्रीरामपूर व राहाता येथे शिवथाळीचा स्वाद गरजूंपर्यंत गेलेला नाही. जिल्हा पुरवठा विभागाने वारंवार सूचना देऊनही तालुका प्रशासन दाद देत नसल्याचे यावरून लक्षात येते. शासन स्वत: अनुदान देत आहे. अनेक हॉटेलचालक हे केंद्र चालवण्यासाठी पुढे येत आहेत. मग तालुका प्रशासनाला अडचण कशाची आहे? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ---तालुका प्रशासन पुरवठा विभागाला दाद देईना नगर शहरात १२ व आठ तालुक्यांच्या ठिकाणी असे एकूण २० ठिकाणी सध्या शिवथाळी केंद्र सुरू आहेत. तेथे सुमारे ४७०० थाळ्यांचे वाटप सुरू आहे. सहा तालुक्यांना सूचना देऊनही त्यांनी केंद्र सुरू केलेले नाही. याबाबत पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती पुरवठा विभागाकडून समजली. मात्र तालुका प्रशासन पुरवठा विभागाला दाद देत नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.