काष्टी (अहमदनगर) : काष्टी येथील एकाच कुटुंबातून पाच जण शनिवारी दुपारी गायब झाले आहेत. यामध्ये दोन पुरुष, एक महिला, दोन मुलांचा समावेश आहे. या संदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला खबर नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे काष्टी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, गायब झालेल्या कुटुंबाची शेजारी असलेल्या कुटुंबाशी हाणामारी झाली होती. पोलिसांनी सुमारे १२ जणांच्या विरोधात दंगलीचा गुन्हा नोंदवला होता. यामधील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. श्रीकृष्ण काशिनाथ मखरे, अनिशा श्रीकृष्ण मखरे, पुष्कर श्रीकृष्ण मखरे, जय श्रीकृष्ण मखरे, काशिनाथ विनायक मखरे हे घरातून गायब झाले आहेत. यासंदर्भात माणिक मखरे यांनी फिर्याद दिली. श्रीगोंदा पोलिसांनी मिसिंगचा गुन्हा नोंदविला आहे. तसेच काष्टी येथील शिक्षक कॉलनीतून एक महिला घरातून निघून गेली आहे. ती अद्याप परत आली नाही, अशी तक्रारही पोलिसात दाखल आहे.
काष्टीतून दोन दिवसांत सहा जण गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 21:04 IST