शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

बिबट्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:05 IST

अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

राजूर : अकोले तालुक्यातील म्हाळादेवी येथील रंगनाथ किसन हासे या शेतकऱ्याच्या वस्तीवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या फस्त केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.या बाबत येथील वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, रंगनाथ हासे यांच्या वस्तीवर शेळ्यांसाठी पत्र्याची शेड आहे. त्याच्या सभोवताली जाळी लावलेली असून एक कोपरा उघडा आहे. या शेडच्या मागील बाजूने बुधवारी रात्री झेप घेत बिबट्या शेडमध्ये गेला. यात त्याने या शेतकºयाच्या पाच शेळ्या व एक बोकड अशा एकूण सहा शेळ्या ठार मारल्या. सकाळी ही बाब लक्षात येताच रंगनाथ हासे यांनी येथील वन विभागाशी संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल दिलीप जाधव यांच्या सूचनेनुसार वनपाल बी. एस. मुठे, वनरक्षक निलेश कोळी, वन कर्मचारी भरत हासे व बालचंद भोर हे घटनास्थळी पोहोचले. घडलेल्या घटनेची माहिती घेत त्यांनी पंचनामा केला. यात या शेतक-याचे सुमारे ४५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज त्यांनी व्यक्त केला. पशुधन वैद्यकीय अधिकारी राम जाधव आणि पी. डी. भांगरे यांनीही येथे भेट देऊन पाहणी केली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले