शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पपड्या गँगमधील सहा जणांना अटक : ३८ लाख ६९ हजारांचे सोने-चांदी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 11:25 IST

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून सोनाराचा खून करणाऱ्या पपड्या गँगमधील चौघांसह चोरीचे सोने विकत घेणा-या दोघा सराफांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दरोडेखोरांना वर्धा, जालना तर सराफांना बोरगाव (जि़ औरंगाबाद) येथून गुरूवारी ताब्यात घेतले.

अहमदनगर: कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून सोनाराचा खून करणाऱ्या पपड्या गँगमधील चौघांसह चोरीचे सोने विकत घेणा-या दोघा सराफांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. दरोडेखोरांना वर्धा, जालना तर सराफांना बोरगाव (जि़ औरंगाबाद) येथून गुरूवारी ताब्यात घेतले. पवन सागर पवार उर्फ पवन तुकाराम चव्हाण उर्फ पवन पपड्या काळे (वय १९) शुभम सागर पवार उर्फ शुभम तुकाराम चव्हाण उर्फ शुभम पपड्या काळे (वय २० रा. कार्ला चौक, सुदर्शननगर, वर्धा), किशोर कांतीलाल भोसले (वय २२ रा. हासनाबाद ता. भोकरदन जि. जालना), अक्षय सुरेश बिरारे (वय २२ रा. बोरगाव ता. बलंब्री जि. औरंगाबाद) या दरोडेखोरांसह चोरीचे सोने विकत घेणारे राहुल अशोक बिरारे (वय २८ रा.  फुलंब्री) व अनिल शिवाजी बाबर (वय ४० रा. औरंगाबाद) अशी ताब्यात घेतेल्यांची नावे असून, यातील पवन व शुभम हे कुख्यात दरोडेखोर पपड्या काळे याची मुले आहेत. गुन्हा केल्यानंतर दरोडेखोरांना सोनारांना विकलेले १ किलो ३०० गॅ्रम सोने व २ किलो ८४० ग्रॅम चांदी पोलीसांनी हस्तगत केली आहे. पपड्या काळे व त्याच्या २० ते २५ साथीदारांनी १९ आॅगस्ट रोजी कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर दरोडा टाकून दुकानाचे मालक गणेश घाडगे व शाम घाडगे यांच्यावर गोळीबार केला. यात शाम यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश हे गंभीर जखमी झाले़ या गुन्ह्यातील ९ जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ५ सप्टेंबर रोजी नगरसह औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अटक केली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिलीप पवार सहाय्यक निरिक्षक रोहन खंडागळे, ज्ञानेश फडतरे, गणेश इंगळे, सचिन खामगळ, सहाय्यक फौजदार नानेकर, कॉस्टेबल सुनील चव्हाण, योगेस गोसावी, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, संतोष लोढे, भागीनाथ पंचमुखी, रविंद्र कर्डिले,रवी सोनटक्के, विशाल दळवी, अण्णा पवार, योगेश सातपुते, मनोज गोसावी, सचिन अडबल आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस