शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
2
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
3
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
4
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
5
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
6
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
7
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
8
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
9
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
10
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
11
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
12
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
13
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
14
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
15
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
16
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
17
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
18
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
19
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
20
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता

समाजाची परीट घडी विस्कटलेलीच...

By admin | Updated: December 19, 2015 23:48 IST

अहमदनगर : वर्षानुवर्षे कपडे धुणे आणि त्याला इस्त्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या परीट समाजाची घडी अद्याप विस्कटलेली आहे.

अहमदनगर : वर्षानुवर्षे कपडे धुणे आणि त्याला इस्त्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या परीट समाजाची घडी अद्याप विस्कटलेली आहे. या समाजातील बहुतांशी कुटुंब आजही हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्याकडे ना सरकारचे लक्ष, ना बँका त्यांना कर्ज उपलब्ध करू देत असल्याने अनेक हलाखीचे जीवन जगत आहेत. हळूहळू या समाजातील मुले-मुली शिक्षण घेत असून त्यांना शिक्षणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे. नगर जिल्ह्यात साधारण चार हजारांच्या जवळपास परीट समाजातील कुटुंबांचे वास्तव्य आहे. यातील साधारण ६०० कु टुंब नगरमध्ये राहतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या बहुतांशी कुटुंबाचा व्यवसाय कपड्यांना इस्त्री करण्याचा आहे. शहरात काही प्रमाणात या समाजातील तरुण अन्य व्यवसाय अथवा नोकरीत प्रवेश करताना दिसत आहेत. नोकरीत अनेक ठिकाणी या समाजातील व्यक्ती वरिष्ठपदावर पोहचल्या आहेत. व्यवसाय करणाऱ्या परीट कुटुंबासमोर अनंत अडचणी असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. या समाजाला व्यवसायासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक साधनसामग्री आणि भांडवल उपलब्ध करून सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. बँकांचे उंबरठे झिजवूनही कर्ज मिळत नसल्याने या समाजातील तरुण त्रस्त असल्याची खंत परीट समाजाचे शहराध्यक्ष शंकर सोनवणे यांनी व्यक्त केली. अलीकडच्या काही वर्षात समाजातील तरुण एकत्र येत आहेत. यातून समाज संघटना मजबूत होत असून या समाजाला ओबीसी ऐवजी विशेष दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ओबीसी प्रवर्गात १९ टक्के जागा राखीव आहेत. मात्र, ओबीसी प्रवर्गात २९ हून अधिक जातींचा समावेश आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गात गर्दी झाली असून यामुळे परीट समाजाला विशेष आरक्षणाची गरज असल्याचे समाजाचे म्हणणे आहे. याच सोबत कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना सरकारने वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी) सारसनगर भागात परीट समाज मंदिराला समाज मंदिरासाठी दहा गुंठे जागा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी संत गाडगे बाबा यांचे मंदिर आणि सभामंडप उभारण्यात आले आहे. या ठिकाणी जयपूर येथून गाडगेबाबा यांची मूर्ती आणण्यात येणार आहे. सध्या इथे समाजाच्या बैठका, हळदी-कुंकुम उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तसेच दररोज समाजबांधवांपैकी कोणीतरी एकजण आलटून पालटून दिवाबत्ती करत असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. राज्य सरकारकडून अनेक वर्षापासून धोबी समाजावर अन्याय सुरू आहे. यात मागील महिन्यात राज्य सरकारने छापलेल्या परिपत्रकात गाडगेबाबा जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा उल्लेख टाळलेला आहे. सरकारचे हे परिपत्रक धुळे येथील धोबी समाजातील कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहे. सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून लवकर या विरोधात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. - सुनील दळवी, परीट समाज राज्य पदाधिकारी.