शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सायरन..घबराट अन् सुटकेचा नि:श्वास

By admin | Updated: August 10, 2016 00:24 IST

शेवगाव : गजबजलेल्या बाजारपेठेतील मध्यवर्ती केंद्र असलेला शेवगावातील शिवाजी चौक. दुपारची साडेबाराची वेळ. परिसरात ग्राहक व

शेवगाव : गजबजलेल्या बाजारपेठेतील मध्यवर्ती केंद्र असलेला शेवगावातील शिवाजी चौक. दुपारची साडेबाराची वेळ. परिसरात ग्राहक व ग्रामस्थांच्या गर्दीत अचानकपणे सायरन वाजवित पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या. त्यातून उतरलेला फौजफाटा. कुणाला काही कळण्याच्या आत त्यांनी गर्दी हटविण्याच्या कामाला सुरुवात केलेली. त्यामुळे चौकात जमलेल्या सर्वांच्याच मनात धाकधूक वाढलेली. प्रत्येकाचाच प्रश्न कुठं काय झालं? कुठं काय झालं? या प्रश्नाने सर्वांना छळले असतानाच काही वेळातच नजिकच्या पाथर्डी, नेवासा, सोनई परिसरातून दाखल झालेला फौजफाटा. यामुळे परिसराचे वातावरण आणखीच धीरगंभीर बनले. मात्र काही वेळातच पोलीस पथकाचे दंगल नियंत्रणाचे हे प्रात्यक्षिक असल्याची माहिती समजताच सर्वांनीच सुटकेचा सुस्कारा सोडला. यामुळे क्षणात वातावरण बदलण्यास मदत झाली.शेवगावच्या शिवाजी चौकात मंगळवारी दुपारी पोलीस दलाने दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तातडीच्या वेळी इतर सहकारी, सरकारी विभागांचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी किती वेळेत घटनास्थळी दाखल होतात व आपले कर्तव्य बजावण्यात यशस्वी होतात? याची चाचणी घेतली. प्रशिक्षणार्थी तहसीलदार तुषार वाघ, निवासी नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ, तहसील कार्यालयाचे शशिकांत देऊळगावकर, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, सहायक निरीक्षक बाबासाहेब चव्हाण या अधिकाऱ्यांसह महसूल, पोलीस, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी या लुटूपुटूच्या दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकामध्ये सहभागी झाले होते. गुप्तवार्ता विभागाचे राजू चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. (तालुका प्रतिनिधी)