शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सीना धरण ६२ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:24 IST

सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन वर्षानंतर धरण साठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे.

विनायक चव्हाण । मिरजगाव : सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात होणा-या दमदार पावसाने सीना धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दोन वर्षानंतर धरण साठा ६२ टक्क्यांवर पोहचला आहे.गेली दोन वर्षे भीषण दुष्काळाचा सामना केल्यानंतर परतीच्या पावसाने यंदा दिलासा दिला आहे. सीना नदी उगमस्थानी झालेल्या पावसाने धरणाची पाणी पातळी कमालीची वाढली. पावसाआधी कुकडीचे आर्वतन कर्जत तालुक्यात सुरू होते. त्यावेळी प्रशासनाने भोसेखिंडीतून कुकडीचे पाणी सीना धरणात सोडण्यात आले. कुकडीच्या आर्वतनातून ४४७.४७ दशलक्ष घनफूट पाणी धरणात आले. धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे भविष्यात रब्बीच्या पिकांना पाण्याची आवश्यकता भासल्यास धरणातून दोन आर्वतने मिळतील. अद्यापही परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. पाणी आवक अशीच सुरू राहिल्यास धरण लवकरच ओव्हरफ्लो होईल. आठवडाभरापासून ससत पडणाºया पावसाने धरणाच्या लाभक्षेत्रातील कांदा, तूर, कपाशी, भुईमूग, मका, ज्वारी ही पिके धोक्यात आली आहेत.सीना धरण दरवर्षी ओव्हरफ्लो होत नाही. त्यामुळे आवर्तन न मिळाल्याने लाभक्षेत्रातील पिके वाया जातात. धरण २०१० मध्ये ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर सात वर्षानंतर २०१७ मध्ये कुकडीच्या पाण्याचा ५० टक्के साठा व उर्वरित पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाले होते. गतवर्षी हे धरण दोन वर्षांनी ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यानंतर पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे.धरणातील पाणी पातळीधरणाची क्षमता : २४०० दशलक्ष घनफूट, मृतसाठा- ५५२ दशलक्ष घनफूट, गाळ- १८४.००  दशलक्ष घनफूट, आजचा साठा- १५०२.३२ दशलक्ष घनफूट. पाणी पातळी- ७८१.४२ दशलक्ष घनफूट. कुकडीचे पाणी- ४४७.४७ दशलक्ष घनफूट. पावसाची आवक - १ हजार ५०० क्युसेक. टक्केवारी- ६२.५८ 

टॅग्स :DamधरणAhmednagarअहमदनगर