शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

अवैध वाळूउपशाबाबत जिल्हाधिकारी, विखे, पालकमंत्र्यांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 11:15 IST

जिल्ह्यात नियम पायदळी तुडवून वाळू उपसा सुरु असताना व त्यातून पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी बघ्याची भूमिका घेत आहेत. पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही सोयीस्कर मौन पाळून आहेत. प्रशासन, सत्ताधारी व विरोधक या सर्वांचीच वाळूच्या प्रश्नावर मिलीभगत असल्याचा संशय यामुळे निर्माण झाला आहे.

अहमदनगर : जिल्ह्यात नियम पायदळी तुडवून वाळू उपसा सुरु असताना व त्यातून पर्यावरण आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी बघ्याची भूमिका घेत आहेत. पालकमंत्री राम शिंदे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हेही सोयीस्कर मौन पाळून आहेत. प्रशासन, सत्ताधारी व विरोधक या सर्वांचीच वाळूच्या प्रश्नावर मिलीभगत असल्याचा संशय यामुळे निर्माण झाला आहे.जिल्ह्यात प्रशासनाने मार्च महिन्यात राबविलेली वाळू लिलावाची प्रक्रियाच संशयास्पद आहे. हे लिलाव झालेल्या बहुतांश ठिकाणी ठेकेदारांनी क्षमतेपेक्षा बेसुमार उपसा केला आहे. विखे यांच्या राहाता तालुक्यातील हनुमंतगाव येथील ठेक्याला मुदतवाढ देण्याबाबतचे मंत्रालयाचे शुद्धिपत्रकच अधिकृतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयांनी रविवारी काहीही खुलासा न करता उपसा सुरुच ठेवला. या २० हजार ब्रासच्या ठेक्याची बाजारमुल्यानुसार किंमत १० कोटींच्या घरात जाते. तरीही जिल्हाधिकारी मौन पाळून आहेत. सीना नदीची चिंता करताना इतर सर्व नद्यांतील वाळू उपशाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे.विनातारखेचे शुद्धिपत्रक आले कोठून?: शुद्धिपत्रक बेकायदा घुसडल्याचा संशयहनुमंतगाव येथील वाळू उपशाला मुदतवाढ देण्याबाबत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शुद्धिपत्रक पाठविल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र या पत्रकावर तारीख नसल्याचे अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ‘लोकमत’ला ९ एप्रिल तारीख असलेले दुसरेही एक शुद्धिपत्रक मिळाले आहे. मंत्रालयातील प्रशासन म्हणते, आम्ही कोणतेही शुद्धिपत्रकच पाठविलेले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाईलमध्ये हे शुद्धिपत्रक कुणीतरी घुसडल्याचा संशय आहे. जिल्हाधिकाºयांनी या गंभीर प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत उपसा सुरुच ठेवला आहे.अण्णा हजारे अस्वस्थवाळूतस्करांनी अ‍ॅड. शाम आसावा यांना धमकी दिली आहे. ‘लोकमत’वरही दबावतंत्राचा अवलंब केला आहे. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे लक्ष वेधले आहे. अण्णांनी याप्रकणात सर्व माहिती घेतली असून ते चौकशीची मागणी करणार असल्याचे समजते. जिल्ह्यातील काही नेते वाळू तस्करांना पाठिशी घालण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असल्याचीही माहिती आहे. जिल्हाधिकारी द्विवेदी हे त्यांच्या कारकिर्दीत पहिल्याच महिन्यात वाळूच्या प्रश्नामुळे अडचणीत आले आहेत.-------------------------

जिल्ह्यातील वाळू उपशामुळे नदीकाठच्या शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे़ उपशामुळे पाणी पातळीत घट होत आहे. पोलीस व महसूल प्रशासनाने बेकायदेशीर वाळू उपसा रोखण्याबाबत कारवाई करण्याची गरज आहे.- चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस------------------------जिल्ह्यातील बेकायदा वाळू उपशाबाबत ‘लोकमत’ने ठोस भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन. अवैध उपशामुळे पर्यावरणाचा मोठा ºहास होत असून, गुंडागर्दी वाढली आहे़ यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन लक्ष वेधणार आहे़ महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही याबाबत भाजपाच्या वतीने निवेदन देण्यात येईल़ वाळू तस्करीला प्रशासनाने पाठीशी घालणे हे सर्वस्वी गैर आहे. त्याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी.- भानुदास बेरड, जिल्हाध्यक्ष, भाजप--------------------------भीमा नदीतील बेकायदेशीर वाळूउपसा थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न केले़ मात्र कुणीही ऐकत नाही़ बेकायदेशीर वाळूउपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असून, जिल्ह्यात गुंडागर्दी वाढली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांतील वाळू पट्ट्यांचे सर्वेक्षण करून शासनाला किती महसूल मिळाला, किती वाळू उपसली गेली, याचा आढावा घेणे गरजेचे आहे़ यामुळे जिल्ह्यात नेमके काय सुरू आहे, याचा अंदाज येईल़- अण्णासाहेब शेलार, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस-----------------------नदीपात्रातील वाळू उपसा करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात यावी़ परवानगी दिल्यानंतर किती ब्रास वाळू उपसा करण्यास परवानगी दिली गेली आहे, तेवढाच वाळू उपसा करावा़ त्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र अधिकाºयांची नेमणूक करून उपशावर नियंत्रण आणावे़ बेकायदेशीर उपसा रोखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.- शशिकांत गाडे, दक्षिण जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcollectorजिल्हाधिकारी