शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचे मौन, विखेंची थोरातांवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 11:18 IST

महाजनादेश यात्रेनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट टीका टाळली. त्याऊलट राधाकृष्ण विखे यांनी मात्र आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे थोरातांवर टीकास्त्र सोडले. 

संगमनेर : महाजनादेश यात्रेनिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मतदारसंघात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर थेट टीका टाळली. त्याऊलट राधाकृष्ण विखे यांनी मात्र आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे थोरातांवर टीकास्त्र सोडले. गत पाच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी प्रथमच संगमनेरला आले होते. या मतदारसंघातही भाजपची तयारी सुरु असल्याने मुख्यमंत्री काय बोलणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, फडणवीस यांनी थोरातांवर थेट टीकास्त्र सोडले नाही. ‘मी संगमनेरात आज आलो आहे. विधानसभेवर भगवा फडकावून पुन्हा संगमनेरात येईल’, असे ते म्हणाले. संगमनेरात परिवर्तनाची झलक दिसते आहे एवढाच उल्लेख त्यांनी केला.    खासदार डॉ. सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीवेळी नगर उत्तरमधून कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे व शिवसेनेत प्रवेश केलेले श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची देखील याच मैदानावर सभा झाली होती. नगर जिल्ह्यातील सर्व सभांपैकी मुख्यमंत्र्यांची संगमनेरातील सभा महत्वाची होती. कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांच्या मतदारसंघात ते काय बोलणार? याकडे राज्याचे लक्ष लागले होते. संगमनेरात नव्याने झालेल्या न्यायालयाच्या इमारतीसाठी दिलेला वाढीव निधी व त्याचे थोरातांनी घेतलेले श्रेय एवढाच उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. टीका करताना त्यांनी थोरातांचे नाव घेणे टाळले. या सभेत विखे पिता-पुत्र हे दोघेही कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांविरुद्ध आक्रमक झालेले पहायला मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी एका वार्तालापात थोरात यांचे कौतुक केले होते. भाजप प्रदेशाध्यक्षांनी कट्टर विरोधक असलेल्या कॉँग्रेस प्रदेशाध्यक्षांबाबत केलेले कौतुकाचे वक्तव्य अनेकांच्या भुवया उंचावणारे होते. महाजनादेश यात्रेतही फडणवीसांनी थोरातांना थेट लक्ष्य केले नाही. विखे-थोरात यांचे राजकीय वैर आहे. विखे हे थोरात यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. दुसरीकडे भाजपचे नेते मात्र थोरात यांना थेट लक्ष्य करताना दिसत नाहीत. या परस्परविरोधाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर