शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मुख्यालयासाठी श्रीरामपूरचेच गुण जुळणार; जिल्हा विभाजन पुन्हा चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:45 IST

राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजानाच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने नगरमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत. नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी जिल्हा कृती समिती व स्थानिक नेत्यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली आहे.

श्रीरामपूर : मागील भाजप व शिवसेना सरकारमध्ये रखडलेल्या जिल्हा विभाजनाच्या प्रश्नाला महाविकास आघाडी सरकारमध्ये चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्यातील भौगोलिकदृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांच्या विभाजानाच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याने नगरमध्येही त्याचे पडसाद उमटणार आहेत. नगरचे विभाजन होऊन श्रीरामपूर मुख्यालय व्हावे यासाठी जिल्हा कृती समिती व स्थानिक नेत्यांनी नव्याने मोर्चेबांधणी केली आहे.दिवंगत नेते गोंविदराव आदिक यांनी १९७८ मध्ये पुलोद सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री असताना श्रीरामपूरला जिल्ह्याचे मुख्यालय करण्याचा विचार मांडला. त्यादृष्टीने येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयही त्यांनी आणले. तालुका पातळीवरील ते सर्वात पहिले परिवहन कार्यालय ठरले. त्यानंतरच्या काळात मुख्यमंत्री झालेल्या ए. आर. अंतुले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात औरंगाबाद (जालना) व उस्मानाबाद (लातूर) या जिल्ह्यांचे विभाजन केले. तेव्हापासूनच नगर जिल्हा विभाजन व श्रीरामपूर मुख्यालयाचा प्रश्न चर्चेत आहे. मागील भाजप-शिवसेना सरकारमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांनी अनेकदा जाहिररित्या या प्रश्नाला वाच्यता फोडली. तेव्हा श्रीरामपूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र त्यास यश मिळाले नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये लातूर, बीडसह नगर अन्य जिल्ह्याचे विभाजन पुन्हा चर्चेत आले आहे. श्रीरामपुरातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नेते महाविकास आघाडी सरकारचा भाग आहेत. काँग्रेसचे आमदार लहू कानडे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांचा त्यात समावेश आहे. आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.त्यांनीही श्रीरामपूर मुख्यालयाला पाठिंबा दिला आहे. जिल्हा विभाजन होते की त्रिभाजन हे पहावे लागेल. त्रिभाजन हे सुद्धा सरकारच्या विचाराधीन आहे. प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सरकार त्यावर निर्णय घेईल. आपण लोकप्रतिनिधी या नात्याने श्रीरामपूरकरांच्या भावनेसोबतच आहोत. जिल्हा कृती समितीला सर्व ते सहकार्य करत आहे, असे आमदार लहू कानडे यांनी सांगितले.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरcollectorजिल्हाधिकारी