शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युरोपातील ‘रोझी पास्टर’ पक्ष्यांचे श्रीरामपुरात वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:48 IST

‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे.

शिवाजी पवारश्रीरामपूर : ‘पंछी, नदीया, पवन के झोंके! कोई सरहद ना इन्हे रोके !! सरहद तो इन्सानों के लिए हैै,! सोचो हमने, क्या पाया, इन्साँ होके’!! या प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या काव्य पंक्तीचा येथे उल्लेख करण्यामागे कारण विशेषही तसेच आहे. युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.डिसेंबर-जानेवारी हे हिवाळ्यातील दोन महिने त्यांचा येथे सहवास असतो. अशोक साखर कारखाना कार्यस्थळावरील इमारतींवर एकत्र जमून सूर्यास्तानंतर ते आकाशात कवायती सादर करतात. ते पाहण्यासाठी पक्षीप्रेमी व निसर्गप्रेमींची मोठी गर्दी होते. अवघा दहा मिनिटे होणारा आकाशातील त्यांचा अदभूत थरार अचंबित व तितकाच आकर्षित करणारा ठरतो. विशेष म्हणजे वडाच्या एका झाडावर रात्री त्यांचा मुक्काम ठरलेला आहे.शेतातील पिकांचे अवशेष, किडे हा त्यांचा आहार. शेतकरी व अन्य नागरिकांना कसलेही आर्थिक वा मानसिक नुकसान पोहोचू न देता ते या ठिकाणी आपले नाते व मैत्री जोडतात. हे नाते प्रत्येक वर्षी अधिक घट्ट होते आहे. जारो मैैलाच्या आपल्या प्रवासादरम्यान शांतता, सहजीवन यांचाच जणू ते संदेश देणारे दूत ठरले आहेत.

युरोपातील रोझी पास्टर जे भोरड्या, गुलाबी मैैना या नावाने ओळखले जाणारे पक्षी श्रीरामपूर तालुक्यातील अशोक साखर कारखान्यावर मुक्कामी आले आहेत. या ठिकाणी ते गेली दहा वर्षे सातत्याने येतात. युरोपात म्हणजेच त्यांच्या मूळ गावी बर्फवृष्टी सुरू होताच हे पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापत भारताकडे झेपावतात.भारतात दरवर्षी युरोपियन देशांमधून स्थलांतरित होऊन रोझी पास्टर पक्षी नगरमध्ये येतात़ या पक्ष्यांना आपल्याकडे पळस मैना किंवा भोरड्या किंवा गुलाबी मैना म्हणून ओळखले जाते़ नगर शहरातील तारकपूर बसस्थानक, भिस्तबाग, न्यू आर्टस् कॉलेजचा परिसर तसेच नगर तालुक्यातील कापूरवाडी येथेही हे पक्षी हिवाळ्यात आढळतात़ युरोपात बर्फ पडण्यास सुरुवात झाली की पक्ष्यांना अन्न मिळणे अवघड होते़ त्यामुळे अन्नाच्या शोधार्थ ते भारतात येतात़ हे पक्षी साधारणपणे फेबु्रवारीपर्यंत भारतात राहतात़ नंतर हळूहळू पुन्हा त्यांच्या मायदेशात परत जातात.-  प्रा़ सुधाकर कु-हाडे, पक्षी अभ्यासकव्हिडिओ पाहण्यासाठी  www.Lokmat.com  पेजला भेट द्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर