शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम मंदिर भूखंडाच्या अहवालाची टोलवाटोलवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 12:58 IST

श्रीराम मंदिर भूखंडाच्या अहवालावरुन धर्मादाय आयुक्तांच्या अहमदनगर व पुणे कार्यालयात टोलवाटोलवी सुरु आहे. ही दोन्ही कार्यालये या देवस्थानच्या चौकशीचा अहवाल माहिती अधिकारात देण्यास टाळाटाळ करत आहेत.

अहमदनगर : श्रीराम मंदिर भूखंडाच्या अहवालावरुन धर्मादाय आयुक्तांच्या अहमदनगर व पुणे कार्यालयात टोलवाटोलवी सुरु आहे. ही दोन्ही कार्यालये या देवस्थानच्या चौकशीचा अहवाल माहिती अधिकारात देण्यास टाळाटाळ करत आहेत.शेवगावच्या श्रीराम मंदिर या देवस्थानच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडांपैकी अनेक भूखंड भाडेतत्वावर दिले आहेत. या भूखंडांवर संबंधित भाडेकरुंनी नगरपालिकेची काहीही परवानगी न घेता विनापरवानगी बांधकामे उभारली आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर नगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयातील निरीक्षकांनी चौकशी करुन अहवाल सादर केला. मात्र, या चौकशीत अनेक मुद्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणली. त्यामुळे तत्कालीन धर्मादाय उपआयुक्त शिवकुमार डिगे यांनी फेरचौकशीचा आदेश दिला होता. पूर्वीच्याच निरीक्षकांनी ही फेरचौकशी केली असून आपला अहवाल सादर केला आहे.मात्र, या अहवालाची प्रत नगरचे धर्मादाय उपआयुक्त कार्यालय माहिती अधिकारात देण्यास तयार नाही. आम्ही हा अहवाल पुण्याच्या धर्मादाय सह आयुक्त कार्यालयाकडे पाठविला असून त्या कार्यालायाकडून हा अहवाल अर्जदाराला प्राप्त होईल, असे उत्तर नगरच्या माहिती अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान पुणे कार्यालयाने सदरची माहिती नगर कार्यालयाकडे असल्याचे असे लेखी पत्र दिले आहे. अहवाल देण्यात अशी टोलवाटोलवी असल्याने या कार्यालयाचा कारभार समोर आला आहे. अहवाल का दिला जात नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात नगरच्या धर्मादाय उपआयुक्त शेळके यांच्याशी संपर्क साधला असता पुणे कार्यालयाने हा अहवाल उपलब्ध करुन द्यावा, असा पत्रव्यवहार आम्ही करु, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.कर्जत प्रमाणेच शेवगावात घोटाळाकर्जत शहरात दावल मलिक देवस्थानची जागा धनदांडग्यांनी हडप केली. याकडे सर्व यंत्रणांनी दुर्लक्ष केल्यामुळेच तौसिफ शेख या युवकाने आत्मदहन केले. तसाच घोटाळा शेवगाव शहरात श्रीराम मंदिर ट्रस्टमध्ये आहे. यासंदर्भातही धर्मादाय आयुक्त कार्यालय, शेवगाव नगरपालिका, तहसील कार्यालय देवस्थानला पाठिशी घालत आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे उद्या काहीही दुर्घटना ओढावल्यास हे सर्व विभाग त्यास जबाबदार राहणार आहेत. आपण माहिती अधिकारात अहवाल मागितला मात्र तो दिला जात नाही, असे सय्यद आयुब बशीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या कार्यालयांचीच चौकशी होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.स्थानिक अधिका-यांचा भरणानगरच्या धर्मादाय उपआयुक्त कार्यालयात अनेक निरीक्षक हे नगर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी आहेत. त्यामुळे स्थानिक ट्रस्टची चौकशी करताना पक्षपात होण्याचा धोका आहे, असे अनेक जाणकारांचे मत आहे. मोठ्या ट्रस्टसंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. ‘मोहटा’ देवस्थानचा चौकशी अहवाल निरीक्षकांनी सादर केला आहे. मात्र, यावर अद्यापही आदेश झालेला नाही. या देवस्थानसंदर्भात यापूर्वीही एकदा चौकशी झाली. तेव्हाही आदेश न करता अहवाल प्रलंबित ठेवण्यात आला. धर्मादायचे अधिकारी चौकशी प्रकरणात विलंब करतात, असे या प्रकरणातून समोर आले आहे. नामदेव गरड यांनी या सर्व कारभारास आक्षेप घेतला असून औरंगाबाद खंडपीठात दाद मागण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर