शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम हे आपल्या देशाचे प्राणतत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:19 IST

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी उभ्या राहणाऱ्या मंदिराच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रविवारी (दि. १७) येथील ...

स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांची अयोध्येतील श्रीराम जन्मस्थळी उभ्या राहणाऱ्या मंदिराच्या कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा रविवारी (दि. १७) येथील मालपाणी लाॅन्समध्ये संगमनेरकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा दुर्गा तांबे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अशोकराव सराफ, सहसंघचालक सुभाष कोथमिरे, गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, मनीष मालपाणी, श्रीकांत नळकांडे, सहप्रमुख ज्ञानेश आकसाळ, दीपक जोंधळे, विशाल वाकचौरे, प्रविण कर्पे, विवेक कोथमिरे, गिरीश डागा, प्रशांत जोशी, मंगेश सालपे, विरेश आडेप, ओंकार राठी, ज्ञानेश्‍वर बकरे उपस्थित होते.

स्वामीजी म्हणाले, आपल्या देशाचा आत्मविश्वास संपविण्यासाठी परकीय आक्रमकांनी गेली अनेक शतके आक्रमण करुन आपल्या पूर्वजांवर अनन्वीत अत्याचार केले. आपल्या देशातील मंदिरे उध्वस्त करण्यामागेही हेच कारण होते. प्रभु रामचंद्रांच्या जन्मस्थळी विक्रमादित्याने बांधलेले मंदिर जेव्हा बाबराने उध्वस्त तेव्हा भारतीयांनी मोठा संघर्ष केला. आजवर अनेकवेळा तो होत राहीला. अवघ्या तीन एकर जागेसाठी गेली पाच शतके वारंवार झालेल्या संघर्षात तीन लाखांहून अधिकांनी आपले प्राण दिले आहेत. गेल्या ५ ऑगस्ट रोजी त्याच जागी मंदिराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी भूमीपूजन झाले आणि आपल्या सर्वांच्या मनातून हरपलेला तो आत्मविश्वास पुन्हा एकदा निर्माण झाला.

प्रास्ताविक डॉ. मालपाणी यांनी केले. मालपाणी परिवाराच्यावतीने या राष्ट्रमंदिराच्या निर्मितीसाठी मालपाणी परिवारातील ज्येष्ठ सदस्या ललितादेवी व सुवर्णा मालपाणी यांच्यासह उद्योजक राजेश, डॉ. संजय, मनिष व गिरीश मालपाणी आणि संगिता, अनुराधा, रचना व सुनिता मालपाणी यांच्या उपस्थितीत एक कोटी रूपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.

--------

फोटो नेम : १८ मालपाणी परिवार, संगमनेर

ओळ : अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी मालपाणी परिवाराच्या एक कोटी रूपयांचा धनादेश स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांना सुपूर्द करण्यात आला.