शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
3
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
4
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
5
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
6
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
7
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
8
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
9
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
10
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
11
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
12
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
13
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
14
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
15
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
16
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
17
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
18
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
20
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदेकरांनी ५७ वर्षात दिले अवघे चार आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 12:40 IST

श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राहिली आहे.

मतदारसंघाचा इतिहास /बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या ५७ वर्षाच्या राजकीय इतिहासात विधानसभेच्या अकरा निवडणुका झाल्या. यात चार दिग्गज नेत्यांच्या हातात आमदारकीची सत्ता दिली आहे. या काळात भौगौलिक व राजकीय स्थित्यंतरे झाली. यातून श्रीगोंद्याची राजकीय रणभूमी राज्याच्या पटलावर नेहमीच गाजत राहिली आहे.संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर विधानसभा अस्तित्वात आली. १९६२ ला पहिला आमदार होण्याचा मान दलित नेते बाबूराव भारस्कर यांना मिळाला. त्यांनी १९६२ ते १९७७ या काळात सत्तेचा वजीर आपल्या ताब्यात ठेवला. १९७२ ला काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. यावेळी प्रभाकर शिंदे यांना उमेदवारी दिली. बाबूराव भारस्कर यांनी या निवडणुकीत पक्षादेश म्हणून शिंदे यांना पाठिंबा दिला तरी श्रीगोंदेकरांनी आमदारकीची माळ भारस्कर यांच्याच गळ्यात घातली. बाबूराव भारस्कर लोणीव्यंकनाथ येथे समाज मंदिरात असताना त्यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मामलेदार तार घेऊन लोणीव्यंकनाथला आले. मुंबईला जाण्यासाठी ना पैसे.. ना अंगावर कपडे...त्यावेळी स्व.शिवाजीराव जंगले यांचे वडील कान्होजी जंगले यांनी भारस्कर यांना कपडे व प्रवासासाठी १०० रुपये दिले. भारस्कर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले. १९६५ च्या सुमारास तालुक्यातील काष्टी परिसरातील १५-१६ गावांमध्ये घोडचे पाणी आले. दुष्काळी भागातील घोडचा पट्टा ओयासिस झाला. सन १९७२ ला ढोकराईच्या माळरानावर शिवाजीराव नागवडे यांनी श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विकासाचे धुराडे पेटविले. १९७७ ला शिवाजीराव नागवडे यांना आमदारकीची संधी मिळाली. मात्र अडीच वर्षात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस विचारसरणीच्या राजकारणाला श्रीगोंदेकरांनी छेद देत बबनराव पाचपुते यांच्याकडे आमदारकीची सत्ता दिली. पाचपुते १९८० ते १९९५ आमदार राहिले. मात्र शिवाजीराव नागवडे यांनी पाचपुतेंचा राजकीय पिच्छा सोडला नाही. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर पाचपुतेंनी पुन्हा पंधरा वर्षे म्हणजे २०१४ पर्यंत आपणाकडे आमदारकी शाबूत ठेवली.कुकडीचे पाणी अंगणी आले. भीमा, घोड नदीवर बंधारे झाले. दुष्काळी तालुक्याची ओळख पाणीदार तालुका म्हणून झाली. कुकडी, साईकृपा साखर कारखान्याची धुराडी पेटली. भाकरीभोवती फिरणारे राजकारण साखरेभोवती फिरू लागले. प्रचारातील सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टर गेले. अलिशान गाड्यांचा धुराडा उडू लागला. पुन्हा कुकडी, घोडचा पाणी प्रश्न बदलत्या काळात ऐरणीवर आला आहे. राजकारणाचे चंगळवादी विश्व आले. तत्व, निष्ठा गेली. घोडेबाजार सुरू झाला. रात्रीत झेंडे बदल होऊ लागले. त्यामुळे नेत्यांची झोपच संपली. २०१४ मध्ये माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी राष्टवादीचे नेते शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली. शरद पवार यांनी नागवडे, जगताप यांची मूठ बांधून बबनराव पाचपुते यांचा पराभव केला. आमदार राहुल जगताप या युवा नेतृत्वाचा उदय श्रीगोंद्याच्या रणभूमीवर झाला. होम टु होम प्रचार संपला. सोशल मीडियावरच्या दिखाऊ व विकाऊ प्रचाराची सुगी सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा राजकीय प्रतिष्ठा आणि अस्तित्वासाठी २०१९ चा महामुकाबला सुरू झाला. या मुकाबल्यात कोणाला उमेदवारी? कुणाच्या हाती बंडाचे निशाण? याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.सायकल आणि शंभर रुपये बाबूराव भारस्कर हे मूळ शेवगावचे. एक सायकल आणि शंभर रुपये घेऊन याच भांडवलावर १५ आमदारकीची सत्ता भोगली. समाजकल्याणमंत्री झाले. सत्तेच्या माध्यमातून पैसा न कमविता माणसाला माणूस जोडण्याचे काम केले. माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी  १९८० ला बुलेटवर प्रचार केला. आमदारकीची सत्ता मिळवली. या प्रवासात पाचपुतेंनी अनेक प्लॅटफॉर्म बदलले. १९८० ला बबनराव पाचपुते हे अविवाहित होते. ते आमदार झाले. २०१४ ला अविवाहित आमदार म्हणून राहुल जगताप यांनी नवा इतिहास रचला. श्रीगोंद्यातील आमदार असे..१९६२ : बाबूराव भारस्कर१९७७ : शिवाजीराव नागवडे १९८० : बबनराव पाचपुते १९९५ : शिवाजीराव नागवडे १९९९ : बबनराव पाचपुते २०१४ : राहुल जगताप 

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाPoliticsराजकारण