शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : सेनेचे बारा मावळे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 12:28 IST

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सेनापतींनी तोडीस तोड उमेदवार उभे केले आहेत.

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सेनापतींनी तोडीस तोड उमेदवार उभे केले आहेत. सेनापतींनी आपल्या तलवारी धारदार करून एकमेकांवर वार करीत घमासान लढाई सुरू केली असली तरी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणारे सेनेचे नेते घनश्याम शेलार यांनी नगरपालिका निवडणुकीत उतरल्याचे दिसत नाही.२७ जानेवारी रोजी होत असलेल्या श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षा व नगरसेवक पदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजपाने सर्व जागांवर उमेदवार उभे केले आहेत. मात्र शिवसेनेने २० पैकी फक्त १२ जागांवर आपले मावळे उभे केले आहेत. सर्व जागांवर मावळे उभे केले नाहीत की शेलारांनी उमेदवार उभे करताना लक्ष दिले नाही का? अशा प्रश्न निर्माण होत आहे.आमदार राहुल जगताप, नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब शेलार, बाबासाहेब भोस, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर व भाजपाचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, प्रा. तुकाराम दरेकर, बाळासाहेब नाहाटा, पोपटराव खेतमाळीस यांनी उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच बैठका सुरू केल्या आहेत. भाजपमधील निष्ठावंतांनी दत्तात्रय हिरणावळे यांच्या घरी बैठक घेऊन संभाजी ब्रिगेड प्रहारशी गठबंधन करण्याचा पवित्रा घेतला आहे मात्र सेनेच्या गोटात शांतता दिसत आहे.घनश्याम शेलार हे प्रस्थापितांच्या विरोधात लढणारे नेते आहेत पण अचानकपणे शांत झाले आहेत. त्यामुळे राजकीय वतुर्ळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. काही जाणकारांचे मते शेलार यांना उध्दव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी धनुष्यबाण तयार ठेवण्याचे आदेश केले आहेत. त्यामुळे घरच्या मैदानावर विरोधकांची नाराजी नको शेलारांनी सावध भूमिका घेतली असावी. शेलारांनी आता घेतलेली सावध भुमिका त्यांना लोकसभा साठी फायदेशीर होऊ शकते. मात्र आता श्रीगोंदा नगरपालिकेच्या मैदानात धनुष्यबाण हाती घेतलेल्या मावळ्यांचे काय होणार असाही प्रश्न आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा