शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यातील मिरचीचा अमेरिकेतील पिझ्झाला तडका

By admin | Updated: May 18, 2017 13:22 IST

श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या अस्मानी संकटास सामना करावा लागत आहे,

आॅनलाईन लोकमतश्रीगोंदा (अहमदनगर), दि़ १८ - श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईच्या अस्मानी संकटास सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत तालुक्यातील घारगाव, काष्टी, लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांनी पिकविलेली मिरची अमेरिकेत एक्सपोर्ट झाली आहे़ श्रीगोंद्यातील मिरचीच्या तडक्याने अमेरिकेतील पिझ्झा बर्गरला अधिक रुचकर बनविले आहे़फिल्डफ्रेश अ‍ॅगो कंपनीचे अमोल लगड, प्रमोद साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली घारगाव येथील शरद सोपान खोमणे, विलास बांदल, सुर्यजित बांदल, ऋषी बांदल, सुभाष खोमणे, काष्टी येथील नागेश रसाळ, अमोल दळवी, लोणीव्यंकनाथ येथील पप्पू सोनवणे, पिनू अत्रे, पुरूषोत्तम लगड यांनी पिझ्झा व बर्गरमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलोपिनो या मिरचीची लागवड केली आहे़लोणीव्यंकनाथ येथील शेतकऱ्यांचे मिरचीची शेती पाण्याअभावी जळून खाक झाली़ मात्र घारगाव, काष्टी येथील मिरचीचे प्लॉट चांगलेच बहरले आहेत़ शरद सोपान खोमणे यांनी १५ एकर शेतीमध्ये डाळिंब, उस, लिंबोणी अशी पिके घेत इलोपिनो या मिरचीचीही लागवड केली़ मल्चिंग पेपर, ठिबक सिंचनचा वापर करुन फेब्रुवारी महिन्यात ही मिरची लावण्यात आली़ दोन महिन्यानंतर मिरचीची तोडणी सुरु झाली आहे़ही मिरची फिल्डफ्रेश अ‍ॅगो कंपनीच्या माध्यमातून अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यात येणार असून, एकरी २५ ते २७ टन उत्पादन निघण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे़ यातून सुमारे पाच रुपयांचे उत्पन्न मिळणे अपेक्षित असून, या मिरचीसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च झाला आहे़ या मिरचीचा पहिला लॉट अमेरिकेत एक्सपोर्ट करण्यात आला असून, पिझ्झा व बर्गरसाठी ही मिरची उपयुक्त असल्यामुळे मोठी मागणी असल्याचे शेतकरी सांगतात़ मिरचीचे भरला प्रपंचात रंग कुकडीचे पाणी उशीरा सुटले़ त्यामुळे उसाच्या पिकांची वाट लागली़ पण सव्वा एकर क्षेत्रात इलोपिनो मिरचीची १ हजार ६०० रोपे लावली़ त्यासाठी सुमारे दोन लाखाचा खर्च झाला़ सव्वा एकरात २२ टन उत्पन्न १५ एप्रिल अखेर निघाले असून १० ते १२ टन उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे़ हमी भाव असल्यामुळे अपेक्षित पैसेही मिळणार आहेत़ शिवाय या मिरचीला सूर्यप्रकाश भरपूर लागतो़ त्यामुळे उन्हाळ्यात ही मिरची वरदान आहे, असे घारगाव येथील शेतकरी शरद खोमणे यांनी सांगितले़