शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

डरकाळी फोडून सांग जगाला... एक मराठा...लाख मराठा...

By admin | Updated: September 24, 2016 00:09 IST

अहमदनगर : स्वप्नांशा डिके हिने कोपर्डी घटनेतील अत्याचाराबाबतची चीड तिच्या भाषणातून मांडत थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.

अहमदनगर : स्वप्नांशा डिके हिने कोपर्डी घटनेतील अत्याचाराबाबतची चीड तिच्या भाषणातून मांडत थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ती म्हणाली, मुख्यमंत्री भाषण देण्यातच धन्यता मानतात. गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंड द्यावा. आता मराठ्यांची सहनशीलता संपली आहे. मागण्या मान्य करा नाही तर मराठा शांत बसणार नाही.विद्या कांडेकर हिने महिलांवरील अत्याचार आणि शेतकरी आत्महत्या या विषयावर संताप व्यक्त केला. ती म्हणाली, पोलिसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. पोलीस असुरक्षित आहेत. राज्यात जंगलराज सुरू झाले आहे. गणेशोत्सव काळात स्थगित केलेले मोर्चे पुन्हा राज्यात सुरू झाले आहेत. केंद्र व राज्याची कुंभकर्णी झोप मोडण्यासाठी सकल मराठा एक झाला आहे.जयश्री कवडे म्हणाली,कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना सहा महिन्यांच्या आत मृत्युदंडाची शिक्षा द्यावी. अनुभवी पोलीस अधिकाऱ्यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल करावे. भगवा हातात धरणे हे येरागबाळ््याचे काम नव्हे तर त्यासाठी शिवछत्रपतींचे हृदय लागते. आदिती दुसुंगे म्हणाली, अ‍ॅट्रॉसिटीमुळे गुंडांची हिम्मत वाढली. महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात खोटे गुन्हे नोंदवून खंडणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे. या कायद्याचा आधार घेत दहशत निर्माण केली जात आहे. गुंड प्रशासनात धुडगूस घालत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे जीणे कठीण झाले आहे. कायद्यातील कालबाह्य कलमे वगळण्यात यावीत. जात-धर्म न पाहता अन्यायाविरुद्ध आता पेटून उठलो आहोत. मूक मोर्चामध्ये वादळापूर्वीची शांतता असल्याचा इशाराही तिने दिला.अश्विनी जगदाळे म्हणाली, न्याय हक्कांसाठी मराठा एकवटला आहे. जो एकत्र येत नाही तो मराठाच नाही. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. शेतकरी लढ्याची दखल घेतली जात नाही, मात्र धोनीच्या शतकाची दखल घेतली जाते. शेतकऱ्याला फक्त फाशी देतो. त्याच्यासाठी काहीच केले जात नाही. शिक्षणात दारिद्र्यरेषा शिकविली गेली नाही. बापट आयोगाच्या माध्यमातून शैक्षणिक व आर्थिक हक्क मिळाले पाहिजेत. ‘डरकाळी फोडून सांग जगाला, एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणा करून ती थांबली.