शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे शॉटसर्किट : १८ शेळ्या दगावल्या, दोन लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 17:35 IST

पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या.

टाकळी ढोकेश्वर(जि.अहमदनगर) : पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या दरम्यान आलेल्या जोरदार वादळात विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन शेडमध्ये वीज प्रवाह उतरून अठरा शेळ्या दगावल्या.ही वीजवाहक तार पत्र्यावर पडल्याने तारेचा वीजप्रवाह शेडखालील लोखंडी जाळीत उतरला होता. त्यामुळे विजेचा धक्का बसून शेडमधील अठरा शेळ्या दगावल्याने सुरेश जगन्नाथ साळवे यांचा संसार उघड्यावर पडला. त्यामुळे त्यांना मोठी मदत करण्याची गरज आहे. बुधवारी रात्री दोनच्या दरम्यान जोरात वादळ सुटले होते. त्यात विजेच्या खांबावरील वीजवाहक तारांचे शॉर्टसर्किट होऊन साळवे यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडवर तार पडल्याने वीजप्रवाह शेडखालील लोखंडी जाळीत उतरून शेडमधील अठरा शेळ्या जागेवरच दगावल्या. साळवे यांचा सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालनावरच अवलंबून होता. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या घटनेनंतर बुधवारी सकाळी वनकुटे परिसराचे महसूल मंडलाधिकारी शरद झावरे, तलाठी डी. टी. सोबले, सरपंच राहुल झावरे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी झाली होती.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर