महापालिकेकडून पुरेसा रॅपिड अँटिजन किटचा पुरवठा होत नाही. परंतु आता भिंगार छावणी परिषद रुग्णालयात या किट संपल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रॅपिड टेस्ट करण्यास छावणी परिषद रुग्णालयाला मोठी अडचण निर्माण होत आहे. याबाबत आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता वरिष्ठ कार्यालयाकडे रॅपिड किट मागणी करण्यात आली असून, अद्याप किटचा पुरवठा झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. रॅपिड किटचा भासणारा तुटवडा तातडीने दूर करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांची रॅपिड टेस्ट करणे गरजेचे असते. तसेच शस्त्रक्रिया करण्यात येणाऱ्या किंवा अन्य गंभीर रुग्णांची कोरोना टेस्ट करण्यासाठी रॅपिड किट शिल्लक ठेवणे गरजेचे असते. मात्र सरसकट रॅपिड टेस्टचा आग्रह धरल्यामुळे आता हा तुटवडा भासू लागला असून, तालुका स्तरावरुन जिल्हास्तरावर रॅपिड किटची मागणी करण्यात आली आहे.
-----------
रॅपिड अँटिजन चाचणी करण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने रॅपिड अँटिजन किटचा पुरवठा लवकरात लवकर करावा. जेणेकरून भिंगारमधील नागरिकांना लवकरात लवकर कोरोना चाचणी रिपोर्ट मिळून पॉझिटिव्ह असलेल्या नागरिकांना लवकरात लवकर उपचार मिळेल.
- शिवाजी दहिहंडे, भाजप शहर उपाध्यक्ष