शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा; घरगुती बियाण्यांची पेरणी : अवकाळीमुळे बिजोत्पादन वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 12:31 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बीजोत्पादन कार्यक्रमाला मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद व मूगाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

शिवाजी पवार  / 

श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) बीजोत्पादन कार्यक्रमाला मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यंदा नगर जिल्ह्यात सोयाबीन, उडीद व मूगाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

सोयाबीनचे ६० टक्के तर मुगाच्या अवघ्या १२ टक्के बियाण्यांचा पुरवठा होऊ शकला आहे. कर्जत व जामखेड येथे उडदाच्या पेरणीकरिता थेट आंध्र प्रदेशातून बियाणे मागवावे लागत आहे. 

महामंडळाकडून शेतक-यांना सोयाबीन, मूग, उडीद पिकांच्या उच्चतम दर्जाचे बियाणे वाजवी दरात पुरविले जाते. महामंडळ शेतक-यांना चांगला दर देऊन पुन्हा ते बियाणे खरेदी करते.

 मात्र मागील वर्षी जिल्ह्यात पिकांच्या ऐन काढणीवेळी अवकाळीने तडाखा दिला. त्यामुळे सोयाबीन, मूग व उडदाचे उत्पादन वाया गेले. महामंडळाकडे आलेल्या जेमतेम शेतक-यांचे बियाणे गुणवत्तेच्या निकषात नापास ठरले. त्यामुळे ते नाकारण्यात आले. यंदाच्या खरीप हंगामातील पेरणीला त्याचा फटका बसला आहे. 

उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासे, राहाता, कोपरगाव या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली जाते. तेथे यंदा वितरकांनी २८ हजार क्विंटल बियाण्याची मागणी केली होती.

 प्रत्यक्षात पुरवठा मात्र अवघा १६ हजार क्विंटलपर्यंत होऊ शकला. सुमारे ४० टक्के तुटवडा निर्माण    झाला आहे. मात्र शेतकºयांनी स्वत:कडील बियाण्यांची पेरणी केल्याने ही उणीव काही अंशी भरून निघाली. महामंडळाला सोयाबीनच्या ४२ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धता होण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ १९ हजार क्विंटल बियाणे पेरणीस पात्र ठरले.

दरम्यान, जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये उडीद व मूगाची पेरणी ब-यापैैकी होते. दक्षिणेमध्ये साडे तीन ते चार हजार क्विंटल उडीदाच्या बियाण्याची मागणी झाली आहे. मात्र महामंडळ दोन हजार क्विंटलचा देखील पुरवठा करण्यास असमर्थ ठरले. दीड हजार क्विंटल बियाण्याची मागणी एकट्या जामखेड तालुक्यातून झाली आहे. 

महामंडळाने वेळीच गांभीर्य लक्षात घेऊन आंध्र प्रदेशातून   बियाणे पुरविण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. सुमारे ५०० क्विंटल बियाणे त्यातून उपलब्ध झाले असून आणखी काही प्रमाणात ते मिळेल असा विश्वास महामंडळाच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.मुगाच्या ८०० क्विंटल बियाण्याची मागणी असताना महामंडळाकडून कुठलाही पुरवठा होऊ शकलेला नाही.

सोयाबीनचे दर ७४ रुपयांवरउत्पादनाअभावी यंदा महामंडळाने अनुदानित सोयाबीन बियाण्यांचा शेतक-यांना पुरवठा केलेला नाही. यंदा सोयाबीनच्या बियाण्यांचे दर ६५ रुपये किलोहून ७४ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे शेतक-यांना झळ बसली आहे.

शेतक-यांनी स्वत:कडील बियाण्यांची पेरणी करावी याकरिता महाबीजकडून जनजागृती करण्यात आली. एप्रिल व मे महिन्यातील उष्णतेमध्ये प्रयोगशाळेत नापास ठरलेले बियाणे आता हवामानातील बदलामुळे पेरणीयोग्य ठरू शकेल. तशा सूचना शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे तूट भरून निघेल, असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर