शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

शूरा आम्ही वंदिले : सैनिकहो तुमच्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:22 IST

युध्दस्य कथा रम्या असे म्हटले जाते. त्या असतातही रम्य, थरारक, रोमांचक! पण त्यानंतर काय? देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांची समाजाला विस्मृती होते. असा समाज अस्वस्थ व अशांत होतो. विवेक हरवून बसतो. म्हणूनच शहिदांच्या स्मृती फक्त स्वातंत्र्यदिनाला जागृत ठेवून चालणार नाही. या ज्योती सतत तेवत्या ठेवल्या पाहिजेत. आजच्या काळात त्याचीच खरी गरज आहे.

ठळक मुद्देलोकमत अहमदनगर ३१ वा वर्धापन दिन विशेषांक

युध्दस्य कथा रम्या असे म्हटले जाते. त्या असतातही रम्य, थरारक, रोमांचक! पण त्यानंतर काय? देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जवानांची समाजाला विस्मृती होते. असा समाज अस्वस्थ व अशांत होतो. विवेक हरवून बसतो. म्हणूनच शहिदांच्या स्मृती फक्त स्वातंत्र्यदिनाला जागृत ठेवून चालणार नाही. या ज्योती सतत तेवत्या ठेवल्या पाहिजेत. आजच्या काळात त्याचीच खरी गरज आहे.जामशाहीच्या काळापासून अहमदनगरचे सामरिक महत्त्व आहे. निजामशाहीचे बहुतांश सैन्य नगरला असे. निजामशाहीनंतर मोगलांनीही नगरलाच लष्करी तळ ठेवले. औरंगजेब हा नगरहूनच दख्खनची मोहीम राबवायचा. ब्रिटिशांपूर्वीच्या सर्व राजवटींनी अहमदनगरला आपल्या संरक्षण सिद्धतेसाठी महत्त्व दिले. ब्रिटिशांनी ३ आॅगस्ट १८०३ रोजी अहमदनगर शहर आणि किल्ला ताब्यात घेतला. तेव्हापासून ते १८१८ पर्यंत इंग्रजांच्या महाराष्ट जिंकण्याच्या मोहिमांचे महत्त्वाचे केंद्र अहमदनगर शहर व अहमदनगर जिल्हा होता. स्वातंत्र्यानंतरही नगरचे लष्करी महत्त्व कायम राहिले. सध्याचे आर्मड कोअर सेंटर हे रणगाडा प्रशिक्षण केंद्र आणि एम.आय.आर.सी. हे लष्करातील चिलखती वाहनांचे प्रशिक्षण देणारे केंद्र याची साक्ष देतात.विजयी मोहिमांसाठी अहमदनगर जिल्ह्याचे जसे भौगोलिक महत्त्व आहे. तसेच ते लढायांतील योगदानांमध्येही आहे. निजामशाहीतूनच मराठा मंडळींचा उदय झाला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. निजामशाहीसाठी आपण काम करु शकतो तर आपले स्वराज्य का नसावे? ही ठिणगी येथूनच पेटली होती. रणरागिणी चाँद सुलताना, राजे शहाजी, मुत्सद्दी मलिकअंबर अशी कितीतरी नावे नगरशी जोडली गेली आहेत. हा जिल्हा ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेच्या विरोधातही प्राणपणाणे लढला. इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध १८१८ पासून त्र्यंबकजी डेंगळे, राघोजी भांगरे या स्वातंत्र्य योद्ध्यांची परंपरा सुरु झाली आहे. डेंगळे हे संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळीचे तर भांगरे हे अकोल्याचे. या दोघांनी ब्रिटिशांना इतके जेरीस आणले होते की त्यांना पकडण्यासाठी इनाम ठेवण्याची वेळ ब्रिटिश सरकारवर आली होती. दऱ्या, खोºयात फिरुन त्यांनी स्वराज्यासाठी संघर्ष केला. डेंगळे हे ब्रिटिशांविरोधात बंड उभारणारे जिल्ह्यातील पहिले बंडखोर होते, असा उल्लेख संदर्भ ग्रंथांत सापडतो. अकोल्यात नागरिकांनी ब्रिटिश मामलेदार जीवंत जाळल्याच्या घटनेला याचवर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली.सन १८५७ साली अकोले, संगमनेर, राहुरी आणि पारनेर या भागातील भिल्लांनी भागोजी नाईकांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन बंडाचे निशाण उभारले. भिल्लांचे हे बंड देशात गाजले होते. महात्मा गांधींनी पुकारलेल्या मीठाच्या सत्याग्रहातही नगर जिल्हा सक्रिय होता. या सत्याग्रहात नगरचे श्री. नरखेडकर हुतात्मा झाले. स्वातंत्र्य संग्रामातील जिल्ह्यातील ते पहिले हुतात्मा मानले जातात.इतिहासाचा हा संदर्भ एवढ्यासाठी की अहमदनगर जिल्ह्यातील माणसे किती लढाऊ होती व आहेत याची यातून प्रचिती येते. पहिल्या आणि दुसºया महायुद्धात ब्रिटिशांसाठी भारतीय सैन्य लढले. यातही नगरच्या सैनिकांची कामगिरी मोठी होती. संगमनेर तालुक्यातील निमजच्या नामदेव जाधव यांनी दुसºया महायुद्धात केलेल्या कामगिरीमुळे ब्रिटिशांनी त्यांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ दिले. हा ब्रिटिश सैन्यातील सर्वोच्च सन्मान आहे. महाराष्टÑातील केवळ दोघांना ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ मिळाला. त्यात नामदेवराव जाधव एक. जिल्ह्यासाठी हा केवढा मोठा अभिमान आहे.कै. नाथ विठ्ठल पाठक यांनी नगर जिल्ह्याचा ‘स्वातंत्र्य-संग्राम’ लिहिला आहे. दिवंगत बाळासाहेब भारदे व सुरेश जोशी यांनी या ग्रंथाचे संपादन केलेले आहे. या ग्रंथात पाठक यांनी हुतात्मा नरखेडकर यांसह सर्वांचे स्मरण केले आहे. बाळासाहेब भारदे या ग्रंथात म्हणतात ‘इतिहासात वारकरी बनलेला नगर जिल्हा स्वातंत्र्य संग्रामात धारकरी झाला.’ पाठक यांनी हा ग्रंथ लिहिताना जिल्ह्याबाबत एक खंत नोंदवली आहे. ते म्हणतात, ‘जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी सरकारच्या किंवा जनतेच्या पैशावर उभारलेल्या इमारतींवर काही राजनिष्ठ पळपुट्यांच्या स्मृतिशीला दृष्टीस पडतात. परंतु श्री नरखेडकरांचे एखादे साधे स्मृतिचिन्ह उभारले असू नये, याचे आश्चर्य आणि खेद वाटतो’.पाठक यांची ही खंत बोलकी आहे. त्यामुळेच ‘लोकमत’ने यावर्षीच्या वर्धापनदिनी शूर जवानांच्या शौर्यगाथा जिल्ह्यासमोर आणण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहासाचे संकलन काही प्रमाणात झालेले आहे. पण, स्वातंत्र्यानंतर लष्करी जवानांनी जी कामगिरी केली, त्याचे फारसे संकलन दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर भारतीय लष्कराला प्रमुख तीन युद्ध लढावी लागली. तसेच, कारगीलसारख्या अनेक मोहिमाही झाल्या. या सर्व लढायांत भारतीय सैन्याने आपली बाजी लावली. त्यात नगर जिल्ह्यातील अनेक बहादूर जवानांचा समावेश आहे. या युद्धात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेकांना अपंगत्व आले. स्वातंत्र्यानंतरच्या युद्धांमध्ये नगर जिल्ह्यातील एकूण किती जवान देशासाठी लढले? याचा नेमका आकडा मिळू शकला नाही. मात्र, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे असलेल्या नोंदीनुसार या जिल्ह्यातील ५२ जवान स्वातंत्र्योत्तर काळात युद्धाच्या कामगिरीवर असताना देशासाठी शहीद झाले. यापेक्षाही आणखी शहीद असू शकतात, असे या कार्यालयाचे म्हणणे आहे. या ५२ जवानांच्या शौर्यगाथाही आज एकत्रितपणे उपलब्ध नाहीत.भारत सरकार या जवानांच्या कुटुंबीयांना पेन्शन देते. सैनिक कल्याण कार्यालय कुटुंबप्रमुखाप्रमाणे या जवानांच्या कुटुंबीयांच्या सुखदु:खात सहभागी होते. सरकार जवानांसाठी निधी व योजना देते. पण त्यापेक्षाही हे आदर्श सतत समाजासमोर जीवंत राहण्याची आवश्यकता आहे. आपल्या लोकशाहीत देशासाठी जीव देणे हे ‘सर्वोच्च बलिदान’ मानले जाते. असे बलिदान या वीरांनी दिले आहे.त्यामुळे ‘लोकमत’ने ७१ व्या स्वातंत्र्यदिनी देशाच्या या ख-या हिरोंची शौर्यगाथा पुन्हा जिल्ह्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या ५२ शहिदांपैकी काही कुटुंबांचा ठावठिकाणाही आज सापडत नाही. जगण्याच्या लढाईत ते स्थलांतरित झाले असावेत. मात्र, जी कुटुंब भेटली त्यांच्याशी संपर्क करुन ‘लोकमत’ प्रतिनिधींनी त्यांची सद्यस्थिती जाणून घेत या जवानांच्या शौर्यकथांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्ह्यात आजमितीला ११ हजार ५०० नोंदणीकृत माजी सैनिक आहेत. या प्रत्येकानेच देशासाठी योगदान दिले आहे. अनेकजण असे आहेत की जे युद्ध लढले व सुखरुप घरी परतले. त्यांचेही महत्त्व आहेच.‘लोकमत’ने संकलित केलेल्या सर्वच शौर्यकथा थरारक आहेत. त्या लिहिताना व वाचतानाही अंगावर काटा येतो. अनेक कुटुंबीयांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन देत आपल्या जीवाभावाच्या या माणसांची कहाणी सांगितली. या कुटुंबीयांचे कोणाकडे काहीही मागणे नाही. पण, या कुटुंबीयांच्या मागे भक्कमपणे उभे राहणे ही समाजाची जबाबदारी आहे. शहीद झाल्यानंतर केंद्र व राज्य सरकारकडून मिळणा-या आर्थिक मदतीपेक्षाही समाज आपल्याबरोबर आहे व तो सतत शहिदांच्या बलिदानाची जाणीव ठेऊन आहे ही भावना या कुटुंबीयांना बळ देत असते. अनेक उपक्रमांमधून हे करता येणे सहज शक्य आहे. उदाहरणार्थ, शहिदांच्या कुटुंबीयांच्या हस्ते ध्वजारोहण करावे अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केलेली आहे. ती अंमलबजावणी झाली तरी या कुटुंबांना समाधान मिळेल. गावांतील शाळा, विद्यालये शहीद जवानांच्या प्रतिमा लावून त्यांची माहिती फलकांवर देऊ शकतात. शहिदांची जयंती, पुण्यतिथी ग्रामसभांमध्ये साजरी करता येऊ शकते. ग्रामपंचायती आपल्या कार्यालयात शहिदांच्या प्रतिमा लावू शकतात. अशा प्रत्येक उपक्रमाच्या पाठीशी ‘लोकमत’ भक्कमपणे उभा राहील. भोवतालचे सामाजिक वातावरण अस्वस्थ व अशांत होत चालले आहे. आंदोलने, मागण्या, मोर्चा हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. पण, देशाची एकात्मता व सुरक्षितता तसेच शहिदांच्या व क्रांतिकारकांच्या बलिदानाची जाणीव असणे हे समाज विवेकी असल्याचे लक्षण आहे. तो विवेक अशा उपक्रमांतून वाढू शकेल व अशांततेचे वातावरण निवळू शकेल. त्याचीच खरी गरज आहे.- सुधीर लंके(लेखक ‘लोकमत’ अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरIndependence Dayस्वातंत्र्य दिनLokmatलोकमत