शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यात शिवशाही बसने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 16:24 IST

संगमनेर / घारगाव :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. नाशिक पुणे महामार्गावर चंदनापूरी घाटानजीक आनंदवाडी शिवारात याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.नाशिकहून शिवशाही बस  पुण्याकडे जात होती. सकाळी आठ वाजता संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात महामार्गावर या गाडीने पेट घेतला. यामध्ये २२ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली.

संगमनेर / घारगाव :महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बस आणि दुर्घटना हे जणू समीकरणच बनले आहे. नाशिक पुणे महामार्गावर चंदनापूरी घाटानजीक आनंदवाडी शिवारात याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळाली.नाशिकहून शिवशाही बस  पुण्याकडे जात होती. सकाळी आठ वाजता संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात महामार्गावर या गाडीने पेट घेतला. यामध्ये २२ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली.

   याबाबत सविस्तर माहिती अशी की,  गुरुवारी सकाळी नाशिक वरुन ही बस पुण्याला जात होती. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाटानजीक आनंदवाडी शिवारात बस आल्यावर बसच्या इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. बस चालक बट्टू अर्जुन अहिरे यांनी तात्काळ बस रस्त्याच्या कडेला घेतली.बसमधील 22 प्रवाशांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या.परिसरातील नागरिकांना घटना निदर्शनास येताच तात्काळ अग्निशामक केंद्राशी संपर्क साधला.अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या घटनास्थळी येऊन काही मिनिटात आगीवर नियंत्रण आणले.घटनेची माहिती समजताच महामार्ग पोलीस,घारगाव व संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.वाहतूक सुरळीत करण्यात आली.        दरम्यान, शिवशाही बसमध्ये २२ प्रवासी होते. चालकाच्या आग लागल्याचे लक्षात आल्याने, मोठा अनर्थ टळला.