नागवडेंच्या कारला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 20:00 IST
दोन तरुण जखमी : नागवडेंना कोणतीही इजा नाही
नागवडेंच्या कारला अपघात
काष्टी (जि. अहमदनगर) : राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या कारला एक मोटारसायकल आडवी आल्यामुळे अपघात झाला़ यात मोटारसायकलवरील दोघे तरुण जखमी झाले असून, कार चालकही किरकोळ जखमी झाला आहे़ ही घटना सोमवारी सकाळी काष्टी येथे घडली़सोमवारी नागवडे हे पुण्याकडे जात होते़ त्यांची कार काष्टी येथील परिक्रमा कॉलेजच्या प्रवेशद्वारासमोर आली असता कॉलेजच्या प्रवेशद्वारातून अचानक एक मोटारसायकल त्यांच्या कारला आडवी आली़ चालकाने प्रसंगावधान राखून ही कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात वळवली़ त्यामुळे मोटारसायकवरील दोघे तरुण वाचले़ मात्र, दोघांनाही कारचा धक्का लागल्याने ते जखमी झाले़ त्यांना दौंड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यात कारचालक दिलीप भोसले हे किरकोळ जखमी झाले़ नागवडेंना कोणतीही इजा झाली नाही़ नागवडे यांनी दौंडमधील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली़ फोटो 21 नागवडे कार