शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सायकलिंगमध्ये नगरला तिस-यांदा शिवछत्रपती पुरस्कार : रवींद्र करांडेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 11:20 IST

भारतीय सैन्य दलातील हवालदार व नगर तालुक्यातील दरेवाडी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र करांडे यांना सायकलिंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे़

अहमदनगर : भारतीय सैन्य दलातील हवालदार व नगर तालुक्यातील दरेवाडी येथील रहिवासी असलेल्या रवींद्र करांडे यांना सायकलिंग क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे़ त्यामुळे सायकलिंगमध्ये तिस-यांदा नगरला शिवछत्रपती पुरस्कार लाभला आहे़रवींद्र करांडे हे २००९-१० मध्ये विद्यापीठ संघाकडून नगरचे प्रतिनिधीत्व करीत होते़ सर्वसामान्य परिस्थिती असलेले करांडे हे त्यानंतर भारतीय सैन्य दलात रुजू झाले़ त्यानंतरही त्यांनी खेळ सुरुच ठेवला़ सैन्याकडून खेळताना करांडे यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत मजल मारली़ २०१५ मध्ये करांडे यांनी दक्षिण कोरियामध्ये झालेल्या वर्ल्ड मिलिटरी स्पर्धेत सहभाग घेतला होता़२०१६ मध्ये राष्ट्रीय रोड सायकलिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत रौप्य पदक पटकावले़ तर २०१७ मध्ये झालेल्या एशियन रोड सायकलिंग स्पर्धेत करांडे यांनी सहभाग घेतला होता़ त्याशिवाय राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत २०१२ मध्ये रौप्य, २०१३ मध्ये सुवर्ण, २०१५-१६ मध्ये कांस्य पदक पटकावले आहे़ त्यांच्या या कामगिरीची दखल घेत सरकारने त्यांना शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला आहे़ मागील वर्षी नेवासा येथील सायकलपटू गणेशपवार यांनाही सायकलिंगमध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते़ तसेच सतीश झेंडे यांनाही यापूर्वी सायकलिंगमध्ये शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेले आहे़ त्यामुळे करांडे यांच्या रुपाने नगरला सायकलिंगमध्ये तिसºयांदा शिवछत्रपती पुरस्कार लाभला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर