शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नामांतराची भूमिका शिवसेनेची; सरकारची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:15 IST

शिर्डी : राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या ...

शिर्डी : राज्य सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबादच्या नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादऐवजी संभाजीनगर ही नामांतराची भूमिका शिवसेनेची आहे, सरकारची नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भूमिका स्पष्ट केली.

पटेल यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साईबाबांचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी साई संस्थानच्यावतीने पटेल यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोंदकर, अमित शेळके, संदीप सोनवणे, दीपक गोंदकर आदींची उपस्थिती होती. पटेल म्हणाले की, राज्यात तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. सरकार चालवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची एक समन्वय समिती आहे. समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा निघेल. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर व्हावे, ही शिवसेनेची बऱ्याच वर्षांची मागणी आहे. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही.

..............

भंडारा घटनेची चौकशी व्हावी

भंडारा येथील रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही घटना गांभिर्याने घेऊन राज्यातील इतर रुग्णालयात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आंतरराष्ट्रीय पातळीवरील देशाच्या तुलनेत भारतात अधिक महाग असल्याने त्यात तातडीने कपात करून देशातील नागरिकांना केंद्र सरकारने न्याय द्यावा, असेेही पटेल म्हणाले.