अहमदनगर : दुधाला पाच रुपये प्रतिलिटर भाव वाढून मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने अहमदनगर मार्केट कमिटीमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस दूध पाजण्यात आले. आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस असून दुधाची टंचाई निर्माण झाली आहे.जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रतिमेस दूध पाजले. यावेळी रामदास भोर, शरद झोडगे, संदीप गुंड, प्रकाश कुलट, रामदास पोटे, किरण वायन, गजानन पुंड, जीवा लगड, आकाश आठरे, ढबुराव टकले उपस्थित होते.
शिवसेनेने पाजले मुख्यमंत्र्यांना दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:39 IST